सिद्धार्थ मेननचा ट्रिपल धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:28 AM2016-10-19T02:28:26+5:302016-10-19T02:28:26+5:30

अभिनेता सिद्धार्थ मेननचे तीन चित्रपट मामी म्हणजेच मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार

Triple explosion of Siddharth Menon | सिद्धार्थ मेननचा ट्रिपल धमाका

सिद्धार्थ मेननचा ट्रिपल धमाका

googlenewsNext


अभिनेता सिद्धार्थ मेननचे तीन चित्रपट मामी म्हणजेच मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहेत. या तीन चित्रपटांमध्ये एक मराठी चित्रपट, दुसरा हिंंिग्लश आणि तिसऱ्या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. सिद्धार्थ या ट्रीपल धमाक्याविषयी लोकमत सीएनएक्सला सांगतो, की मामी या फेस्टिव्हलला १८ वर्षे झाली. वर्षानुवर्षे चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये माझ्या तीन चित्रपटांचा समावेश असल्याने मी स्वत: आश्चर्यचकित झालो आहे. आज स्वप्नातील ही गोष्ट प्रत्यक्षात घडताना खरेच खूप छान वाटते आहे. या फेस्टिव्हलमधील लव्ह हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा चित्रपट मोठ-मोठ्या फेस्टिव्हलमध्ये जाऊन आला आहे. आता, त्याचे फायनली भारतात मामी या फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग होणार आहे, तर आझाद हा हिंदी लघुपट आहे. या लघुपटात माझ्यासोबत अतुल कुलकर्णी, साक्षी तन्वर आणि नंदू माधव यांचा समावेश आहे, तर तिसरा मराठी चित्रपट राजवाडे अँड सन्स आहे. त्यामुळे सिद्धार्थ सध्या खूष आहे.

Web Title: Triple explosion of Siddharth Menon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.