तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:22 AM2024-10-02T09:22:17+5:302024-10-02T09:23:06+5:30

तृप्ती डिमरी आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमात दिसणार आहे. ती केवळ सिनेमाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त आहे.

Tripti Dimri skips Jaipur event furious ladies mark blank cross on her poster | तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

Animal सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमामुळे चर्चेत आहे. राजकुमार रावसोबत ती सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान काल तृप्तीला जयपूरमध्ये एका इव्हेंटसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तृप्तीने इव्हेंटला होकार दिला होता मात्र ऐनवेळेस ती आलीच नाही. यामुळे इव्हेंटमधील महिला संतापल्या आणि त्यांनी तृप्तीच्या पोस्टरला काळं फासल्याची घटना घडली आहे. मात्र यावर आता तृप्तीच्या टीमने स्पष्टीकरण देत हे खोटं असल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावरजयपूरचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक महिला रागात तृप्ती डिमरीच्या पोस्टरवर काळ्या शाईने रेघोटे ओढत आहे. तसंच तिच्या पोस्टरवर काळं फासलं जात आहे. तृप्तीने इव्हेंटला येणार असं सांगितलं होतं मात्र ती आली नाही म्हणून इव्हेंटमधील महिला भडकल्याचा हा व्हिडिओ आहे. तसंच तिच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचंही त्या महिला बोलत आहेत. 

यावर तृप्तीच्या टीमकडून स्पष्टीकरण आले की, ""तृप्तीच्या 'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमाचं सध्या प्रमोशन सुरु आहे. तिने तिच्या प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण केल्या आहेत. सिनेमासंबंधित शेड्युल केलेल्या सर्व इव्हेंट्सला ती जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिने प्रमोशन सोडून वैयक्तिकरित्या एकटीने कोणत्याही इव्हेंटला होकार दिलेला नव्हता.  हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की यासाठी तिने कोणाकडूनही पैसे किंवा मानधन घेतलेलं नाही."

'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय तिचा 'भूलभूलैय्या 3', 'धडक २' हेही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

Web Title: Tripti Dimri skips Jaipur event furious ladies mark blank cross on her poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.