तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 01:24 PM2024-02-28T13:24:11+5:302024-02-28T13:25:47+5:30

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे.

Triptii Dimri Secures Top Spot on IMDb's Popular Indian Celebrities List of the Week | तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

अभिनेत्री तृप्ति डिमरी सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'ॲनिमल' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे. तृप्तिनं या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सलग चौथ्यांदा अव्वल स्थान मिळवलं आहे. 

तृप्ति डिमरीने 'बॉलिवुडचा किंग खान' शाहरुख खानला मागे टाकले आहे जो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने मृआलिया भट्ट, दीपिका पदुकोण, शबाना आझमी, रश्मिका मंदान्ना, तापसी पन्नू आणि आमिर खान यांनाही मागे टाकून यादीत अव्वल स्थान मिळवले. एक अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. तेरी बातों में ऐसा उल्झा जिया मधील कलाकार देखील टॉप 10 मध्ये आहेत, प्रमुख जोडी क्रिती सेनॉन आणि शाहिद कपूर अनुक्रमे 3 व्या आणि 9व्या क्रमांकावर आहेत.

तृप्ती हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. तृप्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तृप्ती 'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. राजकुमार रावच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
 

Web Title: Triptii Dimri Secures Top Spot on IMDb's Popular Indian Celebrities List of the Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.