तृप्ती डिमरीला लागली मोठी लॉटरी, आता शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:11 AM2024-09-14T10:11:13+5:302024-09-14T10:11:52+5:30

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूरसोबत झळकली. या चित्रपटातील अभिनयाने तिने रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर ती विक्की कौशलसोबत बॅड न्यूजमध्ये दिसली. त्यानंतर आता तिला मोठी लॉटरी लागली आहे.

Trupti Dimri hit the big lottery, now she will be seen romancing Shahid Kapoor | तृप्ती डिमरीला लागली मोठी लॉटरी, आता शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना दिसणार

तृप्ती डिमरीला लागली मोठी लॉटरी, आता शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना दिसणार

अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) 'ॲनिमल' चित्रपटात (Animal Movie) रणबीर कपूर(Ranbir Kapoor)सोबत झळकली. या चित्रपटातील अभिनयाने तिने रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर ती विक्की कौशलसोबत बॅड न्यूजमध्ये दिसली. त्यानंतर आता तिला मोठी लॉटरी लागली आहे. विशाल भारद्वाजच्या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी या दोघांनाही फायनल करण्यात आले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या पुढच्या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. 

साजिद नाडियाडवालाच्या ग्रँडसन एंटरटेनमेंटने शुक्रवारी घोषणा केली की त्याने त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांना कास्ट केले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर शाहिद, तृप्ती, विशाल आणि साजिद नाडियादवाला यांच्या फोटोंचा कोलाज देखील शेअर केला आहे. हे जाहीर करताना, प्रतिभावान दिग्दर्शक, माझा प्रिय मित्र विशाल भारद्वाज आणि अप्रतिम अभिनेता शाहिद कपूर यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.


निर्मात्यांच्या पोस्टवर तृप्तीची प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर तृप्तीनेही कमेंट केली आहे. तिने कमेंट सेक्शनमध्ये एक स्माइली इमोजी पोस्ट केली. चित्रपटाबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पण हँडसम हंक शाहिद शेवटचा सायन्स फिक्शन रोमँटिक कॉमेडी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये दिसला होता. आगामी ॲक्शन थ्रिलर 'देवा'मध्ये तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी यांच्याही भूमिका आहेत. रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आणि सिद्धार्थ रॉय कपूर निर्मित, 'देवा' एक ॲक्शन-पॅक रोलर-कोस्टर राइड थ्रिल आणि ड्रामाने परिपूर्ण असेल. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे. 

ॲनिमलमधून मिळाली मोठी ओळख 
'पोश्टर बॉईज', 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'काला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या तृप्तीला संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या ॲक्शन चित्रपटातील झोयाच्या भूमिकेतून खूप मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. तृप्ती शेवटची 'बॅड न्यूज'मध्ये विकी कौशल आणि एमी विर्कसोबत दिसली होती. 

Web Title: Trupti Dimri hit the big lottery, now she will be seen romancing Shahid Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.