Tubelight Song : सल्लूमियाँकडे खूशखबर, "सजन रेडियो बजइयो जरा..."

By Admin | Published: May 17, 2017 09:13 AM2017-05-17T09:13:32+5:302017-05-17T09:14:25+5:30

"ट्युबलाइट" सिनेमाचं पहिलंवहिलं गाणं प्रसिद्ध करण्यात आलं. सोशल मीडियावर हे गाणं प्रसिद्ध होताच मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी पाहिलं व पसंतीही दर्शवली.

Tubelight Song: Sallumiesa Khushkhbar, "Sajjan Radio Bazio Jaro ..." | Tubelight Song : सल्लूमियाँकडे खूशखबर, "सजन रेडियो बजइयो जरा..."

Tubelight Song : सल्लूमियाँकडे खूशखबर, "सजन रेडियो बजइयो जरा..."

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - बॉलिवूडचा "दबंग" सलमान खानचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित  "ट्युबलाइट" सिनेमाची सिनेरसिक आतुरतेनं वाट पाहत आहेत. मंगळवारी रात्री या सिनेमाचं पहिलंवहिलं गाणं प्रसिद्ध करण्यात आलं.  सोशल मीडियावर हे गाणं प्रसिद्ध होताच मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी पाहिलं व पसंतीही दर्शवली. "सजन रेडियो बजइयो जरा..." असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामुळे सिनेमाबाबत सलमानच्या चाहत्यांमध्ये व प्रेक्षकांमध्ये आणखी उत्कंठा वाढली आहे. 
 
पोस्टर, टीझर आणि गाण्यानंतर आता प्रेक्षक वाट पाहत ते सिनेमाच्या ट्रेलरची. दरम्यान, ""रेडिओ"" गाण्यामध्ये सलमान खूपच निरागस अंदाजात प्रत्येकाला आपल्यासोबत थिरकण्यास सांगत असताना दिसत आहे.  सलमाननं हे गाणं आपल्या ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे. सलमान खानच्या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान आणि छोटा भाऊ सोहेल खाननं एकत्रित दुबईमध्ये हे गाणं रिलीज केले.  गाण्याचे सुरुवातीचे बोल ऐकून असे समजते की सलमानला काहीतरी खूशखूर मिळाली व त्यामुळे तो आपला आनंद साजरा करण्यासाठी सर्वांसमोर नृत्य करताना दिसत आहे.  
 
तसंच गाण्याची कोरिओग्राफी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. या गाण्याला कमाल खान आणि अमित मिश्रानं आपला आवाज दिला असून संगीत प्रीतम यांचे आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. यु-ट्यूब सलमानचं हे गाणं सध्या प्रचंड गाजत आहे. मंगळवारी रात्री रिलीज करण्यात आलेले हे गाणं 31 लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. 

Web Title: Tubelight Song: Sallumiesa Khushkhbar, "Sajjan Radio Bazio Jaro ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.