Tunisha Sharma Death : तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 14:17 IST2022-12-25T14:13:14+5:302022-12-25T14:17:04+5:30
तुनिशा प्रकरणाच्या एफआयआर कॉपीमधून तुनिषा आणि शिझान रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे.

Tunisha Sharma Death : तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी सेटच्या मेकअप रूममध्येच आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू लटकल्यामुळे दम कोंडल्याने झाल्याचे म्हटले आहे. तुनिषाच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तुनिशा प्रकरणाच्या एफआयआर कॉपीमधून तुनिषा आणि शिझान रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. शिझानने तुनिषासोबत ब्रेकअप केल्याने ती तणावात होती. यातच, तुनिषा शर्माने इंस्टाग्राम अपलोड केलेल्या एका व्हिडिओवरून तिचा प्रेमावर अतूट विश्वास होता, असे समजते. एवढेच नाही, तर याच्यासंबंधित 'Love Above Everything' अशी ओळही तिने तिच्या हातावर गोंदवून घेतली होती.
तुनिषाने हातावर गोंदवला होता टॅटू -
तुनिषाचा शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हडिओमध्ये ती आपल्या हातावर एक टैटू (Tattoo) गोंदवताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुनिषाने स्वतःच काही आठवड्यांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला होता. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रिअॅक्शन्स देत आहेत.
टॅटू बनवतानाचा व्हिडिओ केला होता शेअर -
हातावर टॅटू गोंदवतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करत, अखेर शाई लागली. खूप-खूप धन्यवाद. मला हे फार आवडलं, असे तुनिषाने कॅप्शनमध्ये लिहिले होते. तुनिषाचा हा व्हडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. तिचा हा व्हिडिओ 1 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.