‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:03 PM2019-07-26T12:03:58+5:302019-07-26T12:04:32+5:30

दिपक दोब्रीयालने ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ ...

Turning point for career in 'Baba' cinema - Deepak Dobriyal | ‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल

‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल

googlenewsNext

दिपक दोब्रीयालने ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ हा त्यांच्यासाठी अत्यंत वेगळा आणि समाधान देणारा चित्रपट ठरला. म्हणाला की, बारा वर्षांची चित्रपट कारकीर्द एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला!  आजपर्यंक दहा हिंदी चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान  या चित्रपटाने दिले, असेही दोब्रीयालने सांगितले.
दीपक दोब्रियाल या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची संयुक्त निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यु मस्टँग क्रिएशन्सने केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या पहिल्या सिनेमाच्या अनुभवाबाबत आनंद व्यक्त करताना दीपक दोब्रियालने सांगितले की, “इथे मला एवढे प्रेम मिळाले कि, मी मराठी चित्रपटात काम करत आहे असे मला वाटलेच नाही. जेथे भरभरून सर्जनशील काम होते अशा एका चित्रपटसृष्टीत काम करण्याचा करण्याची संधी मला मिळाली आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मराठीतील चित्रपट पाहिल्यावर या चित्रपटसृष्टीचे वेगळेपण लक्षात येते.”या चित्रपटाने मला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सर्वच गोष्टींसाठी मी मराठी चित्रपटसृष्टीचा नेहमीच ऋणी राहीन. 


 ‘बाबा’मध्ये दोब्रियाल एका मुख्य आणि बहिऱ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. न बोलता स्वतःला व्यक्त करणे ही बाब त्याच्यासाठी आव्हानात्मक होती. “अशाप्रकारे संपूर्ण चित्रपट चित्रित करणे कठीण होते. सुरुवातीला मला वाटले की, मी केवळ यातील काही दृश्यं चित्रित करू शकतो, पण अशा प्रकारची व्यक्तिरेखा संपूर्ण चित्रपटात साकारणे आणि ती व्यक्तिरेखा जगणे ही बाब अत्यंत आव्हानात्मक अशीच होती,” तसेत पुढे म्हणाला की, “हिंदी चित्रपटांमध्ये तुमचे सहकारी कलाकार कोणती व्यक्तिरेखा साकारत आहेत याबद्दल कोणालाच काही देणेघेणे नसते. अगदी भावनिक दृश्यंही एकमेकांकडे न पाहताच दिली जातात. पण इथे प्रत्येक कलाकार हा त्याची व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे जगत असतो. मला प्रत्येक सहकलाकाराने उत्तम सहकार्य आणि मदत केली. अगदी कलाकारच नाही तर या चित्रपटाशी जोडला गेलेला प्रत्येकजण, प्रत्येक तंत्रज्ञ हा या चित्रपटाबद्दलबरोबर जगत होता.”

या चित्रपटाची संकल्पना आणि कथा यामुळे मराठी चित्रपट करण्याचे ठरवले. “बाबा’ची संकल्पना ऐकली तेव्हा माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला मागे सारून मी हा चित्रपट करण्याचे ठरवले. मी तात्काळ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तारखांबद्दल विचारले आणि असेही सांगितले की, या चित्रपटासाठी चार महिने मी राखून ठेवत आहे व इतर सर्व गोष्टी बाजूला सारत आहे.

 

जर हा चित्रपट मला मिळाला नसता तर मी आयुष्यात बरेच काही ‘मिस’ केले असते. या संधीसाठी मी राज आर गुप्ता यांचा शतशः आभारी आहे. चित्रपटाच्या संकल्पनेच्या व्यतिरिक्त या चित्रपटाने मला माझी इमेज नव्याने तयार करण्याची संधी दिली. मी विनोदी भूमिका केल्या आहेत, खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत पण ‘बाबा’मुळे माझ्या इमेजला कलाटणी मिळणार हे मात्र नक्की. ‘बाबा’ हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत  आहे. 


सिनेमात दिपक दोब्रीयालसह नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. या चित्रपटाची कथा मनिष सिंग यांनी लिहिली आहे.

 

Web Title: Turning point for career in 'Baba' cinema - Deepak Dobriyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.