"मला ट्रेनमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श...", १४ वर्षांचा असताना टीव्ही अभिनेत्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:16 IST2025-04-16T09:12:51+5:302025-04-16T09:16:22+5:30
१४ वर्षांचा असताना ट्रेनमध्ये टीव्ही अभिनेत्यासोबत गैरवर्तन झालं होतं. यानंतर त्याने ट्रेनने प्रवास करणं सोडून दिलं.

"मला ट्रेनमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श...", १४ वर्षांचा असताना टीव्ही अभिनेत्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार
सिनेइंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचे प्रसंग सेलिब्रिटींकडून कायमच ऐकायला मिळतात. अभिनेत्रींनी अनेकदा याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. पण, केवळ इंडस्ट्रीत काम करतानाच नव्हे तर दैनंदिन आयुष्यातही अनेक सेलिब्रिटींना अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. यात केवळ अभिनेत्रीच नसून काही अभिनेत्यांनीही अशा प्रसंगांचा सामना केला आहे. नुकतंच एका अभिनेत्याने त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.
१४ वर्षांचा असताना ट्रेनमध्ये टीव्ही अभिनेत्यासोबत गैरवर्तन झालं होतं. यानंतर त्याने ट्रेनने प्रवास करणं सोडून दिलं. अभिनेता आमिर अलीने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला. आमिर अली म्हणाला, "मी लहान असताना पहिल्यांदा ट्रेनने प्रवास केला होता. पण, त्यानंतर मी ट्रेनने प्रवास करणं सोडून दिलं कारण मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जात होता. तेव्हा मी फक्त १४ वर्षांचा होतो. त्यानंतर मी माझी बॅग पाठीमागे घ्यायला लागलो. त्यानंतर कोणीतरी माझ्या बॅगमधून पुस्तके चोरली. मला वाटलं पुस्तकं कोण चोरतं? त्यानंतर मग मी ट्रेनने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. ".
"माझे काही मित्र होते ज्यांनी मला हे सांगितलं होतं की त्यांना मुलं आवडतात. मी त्यांना खूप चांगलं ओळखतो. ते मला माझ्या भावासारखे आहेत. मी त्यांच्यासोबत एकच बेड शेअर केला आहे. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा वाटलं की फक्त एका प्रसंगामुळे मी सगळ्यांना त्याच दृष्टीकोनातून बघू शकत नाही. जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा तुम्ही समजुदार बनत जाता आणि तुमचे विचारही बदलतात", असंही अमिर अली पुढे म्हणाला.