"माझ्याकडे IPL तिकिटे मागू नका", नवरा MI चा फिटनेस कोच, पण अभिनेत्रीच्या डोक्याला होतोय ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:41 IST2025-04-16T13:41:24+5:302025-04-16T13:41:50+5:30
आयपीएलचा मराठी अभिनेत्रीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अभिनेत्रीकडे चाहते आयपीएलची तिकिटे मागत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने वैतागून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

"माझ्याकडे IPL तिकिटे मागू नका", नवरा MI चा फिटनेस कोच, पण अभिनेत्रीच्या डोक्याला होतोय ताप
सध्या सर्वत्र आयपीएलचा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएललाही क्रिकेटप्रेमींकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या आयपीएलचा मराठी अभिनेत्रीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अभिनेत्रीकडे चाहते आयपीएलची तिकिटे मागत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने वैतागून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये "माझ्याकडे IPL तिकिटे मागू नका. हे माझं काम नाही", असं म्हटलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ फेम काजल काटे आहे. काजलचा नवरा प्रतिक कदम हा मुंबई इंडियन्स टीमचा फिटनेस कोच आहे. तो क्रिकेटर्सच्या फिटनेसकडे लक्ष देतो. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये नवरा असल्यामुळे नाहक त्रास मात्र काजलला सहन करावा लागत आहे.
दरम्यान, काजलने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. मुरांबा या मालिकेतही काजल दिसली होती. प्रतिक आणि काजलची भेट एका मेट्रोमोनियल साइटवर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रतिक आणि काजलचं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेचच त्याला मुंबई इंडियन्सकडून ऑफर आली.