टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलाईकच्या कारचा अपघात, नवरा अभिनव म्हणाला, "काही मूर्ख लोकांमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 09:06 AM2023-06-11T09:06:35+5:302023-06-11T09:07:37+5:30
आमच्यासोबत झालं, तुमच्यासोबतही होऊ शकतं....
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलाईकचा (Rubina Dilaik) अपघात झाला आहे. तिचा पती अभिनव शुक्लाने (Abhinav Shukla) ट्विटरवर माहिती देत रुबिनाच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहे. सध्या ती पूर्णपणे ठीक असून अशा दुर्घटना कोणसोबतही होऊ शकतात त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहनही त्याने यामाध्यमातून केलं आहे.
अभिनव शुक्लाने लिहिले, "आमच्यासोबत झालं, तुमच्यासोबतही होऊ शकतं. ट्रॅफिक लाईट जंप करणाऱ्या मुर्खांपासून सावध राहा. वरुन ते लोक हसत उभे राहिले. याविषयी अधिक माहिती नंतर देईन. रुबिना कारमध्ये होती आणि आता ती ठिक आहे. तिला प्राथमिक उपचारासाठी घेऊन जात आहे. मुंबई पोलिसांना विनंती अशा मुर्खांवर कडक कारवाई करा."
Happened to us, can happen to you. Beware of idiots on the phone jumping traffic lights. To top it up standing there smiling. More details later. Rubina was in car she is fine, taking her for medical. @MTPHereToHelp@MumbaiPolice request you to take strict action ! @RubiDilaikpic.twitter.com/mOT5FPs4Vo
— Abhinav Shukla (@ashukla09) June 10, 2023
अभिनवने या ट्विटसोबतच गाड्यांचा फोटोही शेअर केला आहे. रुबिना अस्वस्थ आहेच पण आश्चर्यही वाटतंय की लोक असे कसे वागू शकतात. अभिनवच्या या ट्वीटवर मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे. 'ज्या ठिकाणी घटना घडली तिथल्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी' अशी सूचना त्यांनी केली आहे. यापूर्वी 'इश्क का रंग सफेद' फेम अभिनेत्री स्नेहल रायचाही कार अपघात झाला होता. तिची कार एका ट्रकला धडकली होती. तिने लिहिले होते, 'जे घडलं ते मला काही सेकंद समजलंच नाही. अचानक एका ट्रकने मला धडक दिली. माझ्या ड्रायव्हरने मला वाचवलं त्याचे आभार. आम्ही पोलिसांना सूचना केली, ते १० मिनिटाने आले. त्यांचेही आभार.'