टीव्ही अभिनेत्रीला झाले Twins! ३७व्या वर्षी झाली आई, व्हिडिओतून दाखवली जुळ्या मुलांची झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:08 PM2024-12-03T13:08:13+5:302024-12-03T13:08:41+5:30
३७व्या वर्षी टीव्ही अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, लग्नानंतर ३ वर्षांनी झाली आई
गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिल्या आहेत. आणखी एका अभिनेत्रीने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या नुकतीच आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रद्धाने गरोदर असल्याचं सांगत चाहत्यांना खूशखबर दिली होती. आता अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
श्रद्धाने २९ नोव्हेंबर(शुक्रवारी) तिच्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने तिच्या जुळ्या मुलांची झलक दाखवली आहे. श्रद्धाला कन्यारत्न आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. "दोन चिमुकल्यांनी आमचं कुटुंब पूर्ण केलं. आमचं हृदय आनंदाने भरुन गेलं आहे", असं कॅप्शन श्रद्धाने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रद्धा आर्या हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' मालिकेतून पदार्पण केलेल्या श्रद्धाने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'कुंडली भाग्य' या मालिकेमुळे श्रद्धा प्रसिद्धीझोतात आली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सप्टेंबर महिन्यात श्रद्धाने गरोदर असल्याचं सांगितलं होतं. प्रेग्नंन्सीमुळे तिने कामातूनही ब्रेक घेतला आहे.
श्रद्धाने 16 नोव्हेंबर 2021 रोजी राहुल नागलसोबत लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. राहुलबरोबर लग्न करण्याआधी श्रद्धाचा साखरपुडा मोडला होता. आता लग्नानंतर ३ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत.