टीव्ही कपलची रोमँटिक लंडन ट्रीप! ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम; शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:53 PM2024-07-05T14:53:39+5:302024-07-05T15:09:27+5:30

लंडन ब्रीजसमोर केलं रोमँटिक फोटोशूट

बिग बॉस 15 मध्ये ओळख आणि नंतर प्रेमात पडलेलं हे क्युट कपल करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश(Tejaswi Prakash). गेल्या तीन वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. करण कुंद्रा त्याच्या सध्याच्या मालिकेतील एका कोस्टारच्या प्रेमात पडल्याची अफवा पसरली. पण आता दोघांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

करण आणि तेजस्वी लंडनमध्ये एन्जॉय करत आहेत. तिथले रोमँटिक फोटो पोस्ट करत दोघांनी ब्रेकअपच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे करण-तेजस्वीचे चाहते भलतेच खूश झालेत.

लंडनमधला त्यांचा हा फोटो तर चाहत्यांच्या सर्वात जास्त पसंतीस उतरला आहे. यामध्ये तेजस्वी करणच्या मिठीत असून करण तिला कपाळावर किस करताना दिसतोय. आयकॉनिक लंडन ब्रीजसमोर त्यांनी या रोमँटिक पोज दिल्या आहेत.

'सगळे फोटो माझ्या लाडीने क्लिक केले आहेत' असं क्युट कॅप्शन त्याने दिलं आहे. या जोडीला प्रेमाने Tejran असं नाव चाहत्यांनी दिलंय. या नावाने त्यांचे बरेच फॅन अकाऊंट आहेत.

याआधी तेजस्वीनेही लंडनचे फोटो पोस्ट केले होते. ऑफ शोल्डर पिंक ड्रेसमध्ये तेजस्वीचा एकदम सेक्सी लूक दिसत होता. करण तेजस्वीच्या या लंडन ट्रीपवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.