‘रामायण’च्या प्रसारणासंदर्भात सोशल मीडियावर तक्रारींचा पूर, दूरदर्शनवर निष्काळजीपणाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:47 PM2020-04-07T16:47:22+5:302020-04-07T16:48:33+5:30

होय, सोशल मीडियावर दूरदर्शनवर वेगवेगळी टीका होतेय.

tv ramayan telecast on dd national accused of being negligent repeated episodes on social media-ram | ‘रामायण’च्या प्रसारणासंदर्भात सोशल मीडियावर तक्रारींचा पूर, दूरदर्शनवर निष्काळजीपणाचा ठपका

‘रामायण’च्या प्रसारणासंदर्भात सोशल मीडियावर तक्रारींचा पूर, दूरदर्शनवर निष्काळजीपणाचा ठपका

googlenewsNext
ठळक मुद्दे अन्य एका युजरनेही रामायणाच्या प्रसारणातील त्रूटीवर बोट ठेवले.

रामायण ही मालिका  ऑन एअर झाली आणि या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढलेत. लोकग्रहास्तव गत 28 मार्चपासून दूरदर्शनवर पुन्हा एकदा रामायण मालिका सुरु केली गेली. सकाळी 9 आणि रात्री 9 अशा दोन भागात या मालिकेचे प्रसारण सुरु आहे. विशेष म्हणजे, पुन्हा प्रसारित होताच या मालिकेने एक अनोखा इतिहास रचत  सर्वाधिक टीआरपी मिळवणा-या मालिेकेचा मानही मिळवला. पण याचदरम्यान या मालिकेच्या प्रसारणासंदर्भात अनेक तक्रारी समोर येत आहेत. होय, सोशल मीडियावर यानिमित्ताने दूरदर्शनवर वेगवेगळी टीका होतेय.

बेस्ट फिल्म क्रिटिकचा नॅशनल अवार्ड जिंकणारे अनंत विजय यांनी यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 
एकापाठोपाठ एक असे ट्विट करत अनंत विजय यांनी  रामायणाच्या प्रसारणासंदर्भात दूरदर्शनवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.
‘डीडी नॅशनल रामायणाच्या प्रसारणाबद्दल इतका बेजबाबदार कसे असू शकते? प्रकाश जावडेकर ही मालिका बघतात, हे ठाऊक सूनही इतका निष्काळजीपणा कसा?’ असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. ‘रामनवमीच्या दिवशी प्रत्येक घरात राम जन्माचा उत्सव साजरा होत असताना दूरदर्शनवर दशरथांची अंत्ययात्रा दाखवली जात होती. ‘भए प्रकट कृपाला’च्या जागी तासभर ‘शोक धून’ वाजत होती,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या दुस-या ट्विटमध्येही त्यांनी दूरदर्शनच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला़ ‘काल रात्री सुग्रीवचा राज्यभिषेक केल्यानंतर आज पुन्हा बालीच्या वधाच्या प्रसंगापासून मालिकेला सुरुवात झाली. हे काय सुरु आहे, कुणी तर लक्ष द्या,’ असे त्यांनी लिहिले. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी प्रसारभारतीला टॅग केले आहे.

 अन्य एका युजरनेही रामायणाच्या प्रसारणातील त्रूटीवर बोट ठेवले. ‘काल बालीचा अंतिम संवाद पूर्णपणे दाखवला गेला नाही, ना त्याचा अंत्यसंस्काऱ़़’, असे या युजरले लिहिले.
सोशल मीडियावरच्या या तक्रारींवर अद्याप दूरदर्शनने कुठलेही अधिकृत उत्तर दिलेले नाही. आता दूरदर्शन यावर काय उत्तर देते, ते बघूच.

Web Title: tv ramayan telecast on dd national accused of being negligent repeated episodes on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ramayanरामायण