अरुंधतीच्या आयुष्यातलं पाहिलं candle light dinner; आशुतोष देणार प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 16:09 IST2023-03-24T16:08:26+5:302023-03-24T16:09:45+5:30
Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास व्हावा यासाठी आशुतोष प्रयत्न करत आहे.

अरुंधतीच्या आयुष्यातलं पाहिलं candle light dinner; आशुतोष देणार प्रेमाची कबुली
छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. जीवनात अनेक चढउतार पाहिल्यानंतर आता कुठे अरुंधतीच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. सतत घर संसार यात रमणारी अरुंधती पहिल्यांदाच कँडल लाईट डिनरसाठी जाणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा क्षण अत्यंत खास असणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष अरुंधतीला चक्क कँडल लाईट डिनरसाठी घेऊन जाणार आहे. यावेळी अरुंधती भारावून जाते. मात्र, तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे झळकताना दिसत आहे.
दरम्यान, अरुंधतीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास व्हावा यासाठी आशुतोष प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याने घरामध्येच कँडल लाईट डिनरची व्यवस्था केली. त्यामुळे आता या मालिकेची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अरुंधतीने आशुतोष सोबत लग्नगाठ बांधली. आता या दोघांचं नात्याला देशमुख कुटुंबाने आनंदाने स्वीकारलं आहे. अलिकडेच अभिला देखील त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने अरुंधतीची माफी मागितली आहे.