टीना दत्तासोबत घडलेल्या प्रकरणानंतर डायन मालिकेबाबत वाहिनीने घेतला हा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:51 PM2019-03-05T15:51:43+5:302019-03-05T15:55:07+5:30

टीना दत्ता सोबत घडलेल्या प्रकरणावर डायन या मालिकेचे निर्माते आणि वाहिनी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

TV Show Daayan to go Off-air After Tinaa Datta Acusses Mohit Malhotra of Sexually Harassing Her on Sets? | टीना दत्तासोबत घडलेल्या प्रकरणानंतर डायन मालिकेबाबत वाहिनीने घेतला हा निर्णय?

टीना दत्तासोबत घडलेल्या प्रकरणानंतर डायन मालिकेबाबत वाहिनीने घेतला हा निर्णय?

googlenewsNext
ठळक मुद्देडायन या मालिकेच्या सेटवर घडलेल्या प्रकारानंतर हा वाद मिटवण्यापेक्षा अथवा यावर चर्चा करण्यापेक्षा या मालिकेलाच निरोप देण्याचे वाहिनीने ठरवले आहे.

‘डायन’ या मालिकेत लीड रोल साकारत असलेली अभिनेत्री टीना दत्ता हिने तिचा सहकलाकार मोहित मल्होत्रावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. ‘उतरन’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली टीना ‘डायन’च्या सेटवर रडताना दिसली आणि या घटनेचा खुलासा झाला. या गोष्टीची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. या प्रकरणावर या मालिकेचे निर्माते आणि वाहिनी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आता या प्रकरणानंतर ही मालिकाच बंद करण्याचे अँड टिव्ही या वाहिनीने ठरवले असल्याचे बॉलिवूड लाइफने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

या वेबसाईच्या बातमीनुसार डायन या मालिकेच्या सेटवर घडलेल्या प्रकारानंतर हा वाद मिटवण्यापेक्षा अथवा यावर चर्चा करण्यापेक्षा या मालिकेलाच निरोप देण्याचे वाहिनीने ठरवले आहे. डायन या मालिकेतील एका इंटिमेट सीनदरम्यान मोहितने टीनाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. मोहितला शूटींगदरम्यान अनेकदा वॉर्निंग देण्यात आली होती. पण तरीही मोहित थांबला नाही. अखेर टीना सेटवर रडू लागली असे म्हटले जात होते. ‘पिंकविला’शी बोलताना टीनाने मोहितवर थेट आरोप केला नव्हता. पण जे काही घडले, त्याबद्दल मी प्रॉडक्शन टीमला सांगितले असल्याचे तिने सांगितले होते. शूट करताना मोहितशी संबंधित अनेक अडचणी आल्या असून मी बालाजी प्रॉडक्शनसोबत अनेक वर्षं काम केलेय आणि त्यांना मी सर्व प्रकार सांगितला आहे असे तिने सांगितले होते. तसेच हे प्रकरण तिने प्रॉडक्शन टीमकडे सोपवले असल्याचे म्हटले होते. तसेच या मुलाखतीत तिने सांगितले होते की, इंटिमेट सीन्स करताना अनेकदा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते. अनेकदा बजावूनही तो आपली सवय सोडत नाही. याच कारणामुळे तिला अनेकदा त्रास झाला आहे. 

मोहितला याबाबत काही वाहिन्यांनी विचारले असता, टीना आणि माझ्यात कुठलाही इंटिमेट सीन शूट झालेला नाही. त्यामुळे सगळे आरोप निराधार आहेत. टीना माझी चांगली मैत्रिण आहे, असे त्याने सांगितले होते.

Web Title: TV Show Daayan to go Off-air After Tinaa Datta Acusses Mohit Malhotra of Sexually Harassing Her on Sets?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.