प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला मैत्रिणीशी लग्न करण्याचा निर्णय; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 15:00 IST2021-11-04T15:00:00+5:302021-11-04T15:00:00+5:30
kristen stewart: The Twilight Saga या हॉलिवूड चित्रपटात झळकलेली क्रिस्टन गेल्या दोन वर्षांपासून डिलनला डेट करत आहे. २०१९ मध्ये डिलन आणि क्रिस्टन यांची एका पार्टीत भेट झाली होती.

प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला मैत्रिणीशी लग्न करण्याचा निर्णय; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. अनेक दिग्गज कलाकार या वर्षाच्या शेवटापर्यंत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यात विकी कौशल- कतरिना कैफ, रणबीर कपूर- आलिया भट्ट या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या जोड्या खासकरुन चर्चेत आहेत. परंतु, या चर्चांमध्येच आता एका हॉलिवूड अभिनेत्रीची (hollywood actress) चर्चा सुरु झाली आहे. एका हॉलिवूड अभिनेत्री लग्नाचा निर्णय घेतला असून ती तिच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार असल्यामुळे चर्चेत आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये समलैंगिक संबंधांना अनेक ठिकाणी मान्यता मिळू लागल्याचं दिसून येत आहे. अनेक देशांमध्ये समलैंगिक संबंध असणाऱ्या जोडप्यांचा स्वीकार केला जात आहे. इतकंच नाही तर बऱ्याच ठिकाणी कुटुंबीय पुढाकार घेऊन या जोडप्यांची लग्न करुन देत आहेत. यामध्येच प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टन (kristen stewart) हिने तिच्या मैत्रिणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत तिने हे जाहीरपणे सांगितलं आहे.
क्रिस्टन स्टीवर्टन हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने गर्लफ्रेंड Dylan Meyer हिच्यासोबत साखरपुडा केल्याचं जाहीर केलं आहे. सोबतच लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, The Twilight Saga या हॉलिवूड चित्रपटात झळकलेली क्रिस्टन गेल्या दोन वर्षांपासून डिलनला डेट करत आहे. २०१९ मध्ये डिलन आणि क्रिस्टन यांची एका पार्टीत भेट झाली होती. त्यानंतर डिलनने क्रिस्टनला लग्नाची मागणी घातली. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.