Twinkle Khanna Birthday Special : मुलगा आरवने दिलेल्या या वाढदिवसाच्या गिफ्टमुळे ट्विंकल खन्नाची झाली होती चांगलीच पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:15 AM2018-12-29T07:15:00+5:302018-12-29T10:00:41+5:30
ट्विंकल आणि अक्षय यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. ते दोघेही आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. तिचा मुलगा आरवमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली होती असे तिने पॅडमॅन या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.
ट्विंकल खन्नाचा आज म्हणजेच 29 डिसेंबरला आज वाढदिवस असून विशेष म्हणजे तिचा आणि तिचे वडील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. ट्विंकलने आजवर जान, मेला, बादशहा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केल्यापासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर झाली. पण एक प्रसिद्ध लेखिका म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिने पॅडमॅन सारख्या एका वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
ट्विंकल आणि अक्षय यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. ते दोघेही आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. तिचा मुलगा आरवमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली होती असे तिने पॅडमॅन या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. एका टॅबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने मुलगा आरव भाटियामुळे आपली एकदा कशी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती त्याचा अनुभव सांगितला होता. रिपब्लिक वेबसाइटने हे वृत्त दिले होते. आरवने एकदा असा खोडकरपणा दाखवला की, ज्यामुळे ट्विंकलची चांगलीच पंचाईत झाली होती.
माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहावे असे मला अजिबात वाटत नाही. माझा मुलगा आरव 1996 सालच्या माझ्या जान चित्रपटातील एक क्लिप सारखी सारखी पाहायचा. ट्विंकल सहअभिनेत्याच्या छातीचे चुंबन घेत असल्याचा तो सीन होता. आरव तोच सीन सारखा सारखा पाहत राहायचा. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आरवने त्या सर्व सीन्सचे एकत्र कोलाज करुन ट्विंकलला तिच्या एका बर्थ डे ला पाठवले. त्यामुळे ट्विंकलची चांगलीच पंचाईत झाली होती.
ट्विंकलने 1995 साली बॉबी देओलसोबत बरसात सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. लव्ह के लिये कुछ भी करेगा हा ट्विंकलचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर तिने लेखन, इंटिरियर डिझायनिंग या आपल्या आवडीच्या क्षेत्रावर सर्व लक्ष केंद्रीत केले.