हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:28 AM2021-05-10T10:28:17+5:302021-05-10T10:34:37+5:30

Mrs Funnybonesच्या पोस्टची नाही, या मजेशीर उत्तराची आहे चर्चा

Twinkle Khanna calls husband Akshay Kumar her ‘specific device’ to get perfect photos! | हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर

हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी एका युजरने ट्विंकल ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. यावर तिने त्याला चांगलेच सुनावले होते.

काल मदर्स डे निमित्ता बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आईसोबतचे फोटो  शेअर  केलेत. ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) त्यापैकीच एक. ट्विंकलने आई डिंपलसोबतचा फोटो शेअर केला. पण या फोटोची किंबहुना या पोस्टची वेगळ्याच कारणाने चर्चा रंगली. होय, ट्विंकलच्या या पोस्टवर एका युजरने प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना ट्विंकल खुद्द पती अक्षय कुमारचीच (Akshay Kumar) मजा घेताना दिसली.
ट्विंकलने शेअर केलेला फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट होता. यात ती आणि तिची आई डिंपल (Dimple Kapadia) आपआपल्या कामात बिझी आहेत.

‘सद्यपरिस्थितीत आम्ही मदर्स डे अगदी मस्त साजरा केला. आम्हा दोघींचेही हात रिकामे राहू शकत नाही. आई स्केचिंग करतेय आणि मी माझे एम्ब्रॉडरी वर्क करतेय शिवाय सोबत सोबत मस्तपैकी गप्पा सुरू आहेत. हॅपी मदर्स डे,’ या कॅप्शनसह ट्विंकलने हा फोटो शेअर केला.
या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला नसेल तर नवल. एका चाहत्याने मात्र या फोटोवर कमेंट करताना एक वेगळाच प्रश्न विचारला. असले फोटो तू क्लिक कशी करतेस? असे फोटो क्लिक करण्यासाठी तुझ्याकडे एखादे खास डिव्हाइस आहे का? असे त्याने विचारले. आता ट्विंकल या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे कसे होणार. यावर तिने चांगलेच मजेशीर उत्तर दिले.
‘हाहाहा, माझ्याकडे नवरा आहे, जो असे फोटो क्लिक करतो. दुस-या शब्दांत सांगायचे तर हो, माझ्याकडे हे एक खास डिव्हाइस आहे,’ असे उत्तर तिने दिले.


काही दिवसांपूर्वी एका युजरने ट्विंकल ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. यावर तिने त्याला चांगलेच सुनावले होते. ‘ट्विंकलजी, तुझा नवरा देशातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. पैसे गोळा करून देणग्या वाटण्यापेक्षा तुम्ही थोडे उदार झाले असते तर चांगले होईल,’ असे या युजरने लिहिले होते. यावर ट्विंकलने या युजरची शाळा घेतली होती. ‘आत्तापर्यंत 100  कंसेट्रेटर डोनेट केली आहेत. याशिवायही मदत सुरूच आहे. पण गोष्ट माझी वा तुझी नाही. सर्वांनी एकत्र येऊन मदत करण्याची आहे. देशाला सर्वांच्या मदतीची गरज असताना काही लोक दुस-यांचे पाय ओढण्यात लागले आहेत,’ असे ट्विंकलने या युजरला सुनावले होते.

 

Web Title: Twinkle Khanna calls husband Akshay Kumar her ‘specific device’ to get perfect photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.