‘ब्लास्ट’, ‘वानखेडे स्टेडियम’ शब्द मी चुकूनही वापरणार नाही....’ ट्विंकल खन्नाने घेतला ‘एनसीबी’चा धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:36 PM2021-11-01T12:36:57+5:302021-11-01T12:37:33+5:30
Twinkle Khanna : आर्यनला जामीन मिळवण्यासाठी शाहरूख खान व गौरी खानला बरेच प्रयत्न करावे लागले. यावर ट्विंकलने उपरोधिक टीका करत एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केलं आहे.
अक्षय कुमारची (Akshay Kumar ) बायको ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna ) म्हणजे एक परखड व्यक्तिमत्त्व. अनेक मुद्यावरचे तिचे उपरोधिक टोमणे, फटके म्हणजे हेडलाईन्सचा विषय. आता तिने गेल्या महिनाभरापासून गाजणा-या एका प्रकरणावर अशीच उपरोधिक टीका केली आहे. हे प्रकरण काय, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. अर्थातच आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drug Case). आर्यनला जामीन मिळवण्यासाठी शाहरूख खान व गौरी खानला बरेच प्रयत्न करावे लागले. मोठ्या मानसिक त्रासातून जावं लागलं. यावर ट्विंकलने उपरोधिक टीका करत एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केलं आहे.
ट्विंकल ने एक ब्लॉग लिहिला आहे. तोही उपरोधिक अंगाने. तर ट्विंकलचा चुलत भाऊ तिला सीबीडी ऑईलचं दुकान सुरू करण्याचा सल्ला देतो (अर्थात मस्करीत)आणि त्याचा हा सल्ला ऐकून ट्विंकलला अक्षरश: घाम फुटतो, अशा उपरोधिक अंगाने तिनं हा ब्लॉग लिहिलायं.
It’s raining boycotts!Along with refraining from using words like blast,Diet Coke & ‘Wankhede Stadium’I am off to boycott Sabyasachi’s https://t.co/ppZ7HFgHsf others in this group,this is regardless of whether we contemplated buying it in the first place. https://t.co/0noL5MTEKQpic.twitter.com/QBzn5H1aSz
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) October 31, 2021
ब्लॉगमध्ये ती लिहिते,
‘थांब, मस्करी म्हणूनसुद्धा अशा गोष्टी बोलू नकोस. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मी तर आता ब्लास्ट, हाय, डाएट कोक किंवा वानखेडे स्टेडियम हे शब्दही चुकूनही उच्चारणार नाहीये. कारण त्यांनी माझा फोन जप्त केलाच आणि माझे व्हॉट्सअॅप चॅट्स तपासलेच तर, त्या चॅटमधून ते कोणता अर्थ काढतील याचा काही नेम नाही. शिवाय तू पाहू शकतोच की, सध्या जामीन मिळवण्यासाठी पदवी मिळवण्यापेक्षाही जास्त काळ लागतो. त्यामुळे मी तुझ्यासोबत हा व्यवसाय सुरू करू शकत नाही. ते कदाचित ऐकत असतील म्हणून मी पटकन माझं स्पष्टीकरण दिलंयं.’
याआधीच्या लेखातही ट्विंकलने आर्यनच्या प्रकरणावर भाष्य केलं होतं. ‘त्याचा मित्र 6 ग्रॅम चरस घेऊन जात असताना, आर्यन खानकडे काहीच सापडलं नव्हतं. तरीही, तो मुलगा आर्थर रोड तुरुंगात जवळपास दोन आठवड्यांपासून शिक्षा भोगत आहे,’अशा शब्दांत तिनं संताप व्यक्त केला होता.