ट्विटर युजरने शोधली ‘गहराइयां’तील इतकी मोठी चूक, तुमच्या लक्षात आली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:31 AM2022-02-23T11:31:22+5:302022-02-23T11:32:03+5:30
Gehraiyaan : आत्तापर्यंत दीपिका व सिद्धांतच्या चित्रपटाची बोल्ड सीन्सची चर्चा झाली. आता एका वेगळ्याच कारणाने ‘गहराइयां’ची चर्चा होतेय.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Sidharth Malhotra),अनन्या पांडे (Ananya Pandey), धैर्य कारवा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गहराइयां’ (Gehraiyaan) हा सिनेमा कधीच रिलीज झाला. पण या ना त्या कारणाने हा चित्रपट अद्यापही चर्चेत आहे. आत्तापर्यंत दीपिका व सिद्धांतच्या चित्रपटाची बोल्ड सीन्सची चर्चा झाली. आता एका वेगळ्याच कारणाने चित्रपटाची चर्चा होतेय. ते कारण म्हणजे, चित्रपटातील एक चूक. होय, एका ट्विटर युजरने चित्रपटातील एक चूक शोधून काढली आहे.
One thing unresolved in #Gehraiyaan is how Tia’s glass transformed in this scene when she never put it down? 😆 pic.twitter.com/PFGG5aohcZ
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) February 21, 2022
क्लो-अमांडा बेली या एका ट्विटर युजरने या चित्रपटातील एका दृश्याचे दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोत अनन्या पांडे दिसतेय. फरक आहे तो तिच्या हातातल्या ग्लासचा. होय, पहिल्या फ्रेममध्ये तिच्या हातात वेगळ्या आकाराचा ग्लास आहे. तर दुसऱ्या फ्रेममध्ये या ग्लासचा आकार वेगळा दिसत आहे. ही चूक या युजरने नेमकी पकडली आणि ती पाहून सगळेच थक्क झालेत.
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) February 22, 2022
युजरने एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात अनन्या बाल्कनीमध्ये पाण्याचा ग्लास घेऊन उभी असल्याचे दिसतेय. त्यात तिच्या हातातील ग्लास हा वेगळ्या आकाराचा आहे. याच दृश्याच्या शेवटी अनन्या पुन्हा पाणी पिताना दिसतेय. मात्र यावेळी तिच्या हातात एक वेगळा आकार असलेला ग्लास दिसतोय. सध्या हा व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे. इतकी बारीक चूक पकडल्याबद्दल नेटकरी या युजरचं कौतुक करत आहेत.
गेल्या 11 फेबु्रवारीला ‘गहराइयां’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका व सिद्धांतने अनेक बोल्ड इंटिमेट सीन्स दिले आहेत. चित्रपट काहींना आवडला आहे तर काहींना तो अजिबात आवडलेला नाहीये. पण दीपिका व चित्रपटाची स्टारकास्ट खुश्श आहे. नुकतीच दीपिकाने या चित्रपटाची सक्सेस पार्टी होस्ट केली होती.