Video: नादच खुळा... चाहत्यांच्या १०० कुटुंबासाठी विजय देवरकोंडाची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 07:34 PM2023-09-05T19:34:19+5:302023-09-05T19:36:06+5:30
विजय अन् समांथाच्या 'खुशी' सिनेमातील गाणीही प्रेक्षकांना आवडली आहे.
Kushi Box Office Collection Day 3: साऊथचे चित्रपट, साऊथचे हिरो आणि त्यांचे चाहते व चाहत्यांसाठी त्यांचीही असलेली क्रेझ नेहमीच चर्चेचा विषय असतो. एखाद्या चित्रपटाच्या रिलीजवेळी हे पाहायला मिळते. विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभुचा बहुप्रतिक्षित 'खुशी' सिनेमा १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. समांथा आणि विजयची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे परिणामी या सिनेमान पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या खुशीत विजय देवरकोंडाने चाहत्यांसाठी मोठी घोषणा केलीय.
विजय अन् समांथाच्या 'खुशी' सिनेमातील गाणीही प्रेक्षकांना आवडली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू स्टारर कुशीने १६ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईचे आकडे पडले. आता रविवारचे कलेक्शनही समोर आले आहे. रविवारी या सिनेमाने ११ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यासह सिनेमाची आतापर्यंतची ऐकूण कमाई ३६. १५ कोटींवर गेली आहे. या खुशीत विजय देवरकोंडाने चाहत्यांसाठी मोठी घोषणा केलीय. आपल्या १०० चाहत्यांच्या कुटुंबास तो प्रत्येकी १ लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Just IN: Vijay Deverakonda to give ₹1 lac each to 100 families in the next 10 days.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) September 4, 2023
Total - ₹ 1 cr
||#Kushi | #VijayDeverakonda|| pic.twitter.com/mpvGfO2t8H
विशाखापट्टणम येथील कार्यक्रमातील विजयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विजय म्हणतो, 'माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी १०० कुटुंबांमध्ये एक कोटी रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करत आहे. १०० कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.' विजयच्या या घोषणेवर चाहत्यांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केल्याचंही व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
दरम्यान, फिल्म ट्रेड विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी विजयच्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानुसार, विजय हा १०० कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपये येत्या दहा दिवसात वाटप करणार आहे.