"कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही", अनुराग ठाकूर यांनी मांडली सरकारची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 03:36 PM2023-06-19T15:36:36+5:302023-06-19T15:37:33+5:30

adipurush collection : 'आदिपुरुष' चित्रपटावरून वाद रंगला आहे.

Union Minister Anurag Thakur said that no one has the right to hurt feelings from the movie adipurush | "कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही", अनुराग ठाकूर यांनी मांडली सरकारची भूमिका

"कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही", अनुराग ठाकूर यांनी मांडली सरकारची भूमिका

googlenewsNext

मुंबई : 'आदिपुरुष' चित्रपटावरून वाद रंगला आहे. अशातच केंद्र सरकारने याबद्दल आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) हा निर्णय घेतला असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. चित्रपटातील संवाद बदलण्याचे आश्वासनही लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, निर्मात्यांनी संवाद बदलण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या मला मिळाल्या आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.  

दरम्यान, आदिपुरूष चित्रपट शुक्रवारी म्हणजेच १६ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला आदिपुरूष देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अनेकांनी या चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतला आहे. यावरूनच देशातील विविध भागात चित्रपटाला विरोध दर्शवला जात आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील जोर धरत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आदिपुरूषवरून वाद पण चित्रपट 'सुसाट'
आदिपुरूष चित्रपटाला वाढत चाललेला विरोध चित्रपटाला फायदा करून देत असल्याचे दिसते. कारण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी काही संवाद बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह चित्रपट दाखवण्यात येणार आहे. खरं तर राजकीय पक्ष देखील 'आदिपुरुष'वरून रिंगणात उतरले आहेत. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Web Title: Union Minister Anurag Thakur said that no one has the right to hurt feelings from the movie adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.