Raveena Tandon Birthday: त्या दिवशी ही घटना घडली नसती तर 'मोहरा' सिनेमात अक्षयची हीरोइन असती 'ही' अभिनेत्री, वाचा काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:18 PM2021-10-26T12:18:03+5:302021-10-26T12:18:14+5:30

'मोहरा' चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त' हे गाणे आजही रसिकांच्या ओठावर रुळत असते. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की रवीना टंडनला 'मस्त मस्त गर्ल' या नावानेच चाहते ओळखु लागले.

Unknown fact on Raveena Tandon, she wouldn't be replacing this actress in Mohra if this incident wasn't happened | Raveena Tandon Birthday: त्या दिवशी ही घटना घडली नसती तर 'मोहरा' सिनेमात अक्षयची हीरोइन असती 'ही' अभिनेत्री, वाचा काय घडले

Raveena Tandon Birthday: त्या दिवशी ही घटना घडली नसती तर 'मोहरा' सिनेमात अक्षयची हीरोइन असती 'ही' अभिनेत्री, वाचा काय घडले

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये 'मस्त मस्त गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. 26 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या रवीनाने 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिलवाले' आणि 'मोहरा' या चित्रपटांमुळे तिला खरी ओळख मिळाली. 'मोहरा' चित्रपटाने रवीनाला रातोरात सुपरस्टार बनवले. हा चित्रपट रवीना आधी दुस-याच अभिनेत्रीला ऑफर करण्यात आला होता. अभिनेत्रीने चित्रपटाचे 5 दिवस शूटिंगही केले होते. पण नंतर या अभिनेत्रीचा अपघात झाला आणि तिला तिथेच शूटिंग थांबवावे लागले.ही अभिनेत्री होती दिव्या भारती.  दिव्या भारतीच्या जागी रवीना टंडनला या चित्रपटात कास्ट करावे लागले.

मोहरा हा चित्रपट बनवण्याची कल्पना लेखक शब्बीर बॉक्सवाला यांना जिममध्ये आली. कथा पूर्ण झाल्यानंतर त्याचे कास्टिंग सुरू झाले. दिग्दर्शक राजीव राय आणि निर्माता गुलशन राय यांना मुख्य अभिनेत्रीसाठी श्रीदेवीला कास्ट करायचे होते. त्यावेळी श्रीदेवी चंद्रमुखी चित्रपटात व्यस्त असल्याने काम करण्यास नकार दिला होता.

श्रीदेवीने नकार दिल्यानंतर अभिनेत्री दिव्या भारती, जिला त्याकाळी श्रीदेवीची लूक लाइक म्हणून ओळखले जायचे, तिला या चित्रपटात साईन करण्यात आले. दिव्या भारतीनेही या चित्रपटाचे 5 दिवस शूटिंग केले होते. दरम्यान, 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारतीचा इमारतीवरून पडून गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. दिव्या भारतीच्या निधनानंतर निर्माते चित्रपटासाठी नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते.

यानंतर निर्मात्यांनी अनेक नावांवर चर्चा केल्यानंतर अखेर रवीना टंडनला संधी देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे दिव्या भारतीच्या अकाली निधनानंतर रवीनाला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, रवीनाने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या नृत्यानेही सर्वांना वेड लावले.

या चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त' हे गाणे आजही रसिकांच्या ओठावर रुळत असते. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की रवीना टंडनला 'मस्त मस्त गर्ल' या नावानेच चाहते ओळखु लागले.  हे गाणे मुळात नुसरत फतेह अली खान यांच्या कव्वाली ''दम मस्त कलंदर मस्त मस्त'' वर आधारित आहे.
 

Web Title: Unknown fact on Raveena Tandon, she wouldn't be replacing this actress in Mohra if this incident wasn't happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.