उलगडले वसंत देसाई
By Admin | Published: January 10, 2016 03:03 AM2016-01-10T03:03:30+5:302016-01-10T03:03:30+5:30
जन्माने मराठी असून, हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची चांगली कारकीर्द घडविणाऱ्या संगीत दिग्दर्शकांमध्ये सी. रामचंद्र आणि वसंत देसाई यांची नावे आवर्जून घेतली जातात. वसंत देसाई जर आज हयात
- अमरेंद्र धनेश्वर
जन्माने मराठी असून, हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची चांगली कारकीर्द घडविणाऱ्या संगीत दिग्दर्शकांमध्ये सी. रामचंद्र आणि वसंत देसाई यांची नावे आवर्जून घेतली जातात. वसंत देसाई जर आज हयात असते, तर त्यांचं वय १0३ वर्षे असतं. अतिशय स्वरेल आणि केवळ कानाला गोड लागणाऱ्याच नव्हे, तर हृदयालाही भिडणाऱ्या चाली वसंत दसार्इंनी दिल्या.
वसंतरावांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली ४0 वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. रवींद्रनाथांनी लिहिलेली ‘जनगणमन’ आणि ‘आमार शोनार बांगला’ ही गीते अनुक्र मे भारत आणि बांगलादेश या दोन सार्वभौम राष्ट्रांची राष्ट्रगीते झाली, त्यालाच हा सन्मान म्हणायचा. ‘स्वरयोग’ या संस्थेतर्फे गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघ सभागृहात एक देखणा आणि श्रवणीय कार्यक्रम पार पडला. त्यात तोडी, दरबारी, बिहाग, देस, मियॉमल्हार, यमन, भैरवी वगैरे रागांचा वापर वसंत देसार्इंनी कसा केला, हे प्रत्यक्ष गाण्याच्या माध्यमातून दिसले आणि अनुभवता आले. प्रदीप देसार्इंचे निवेदन, कैलाश पात्र यांची अप्रतिम व्हायोलिन साथ आणि मुक्ता रास्ते यांची दमदार साथ या कार्यक्रमाला होती. ज्येष्ठ संतूरवादक उल्हास बापट यांना वसंत देसार्इंच्या नावाचा पुरस्कार देण्याचा समारंभही या प्रसंगी पार पडला.
उल्हास बापट यांनी रागदारी क्षेत्रात नाव कमावले आहेच, पण चित्रपट उद्योगातही मोठे काम केले आहे. वसंतरावांबरोबरही काम केले आहे. त्यामुळे त्यांची निवड उचितच आहे. सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुराज साठे, योगिता चितळे यांनाही पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
गुर्जर कवींच्या रचना
नानालाल आणि मोघाणी हे गेल्या पिढीतले प्रसिद्ध गुजराती कवी होते. त्याचा प्रत्यक्ष कार्यक्र म रविवारी सकाळी १0 वाजता भारतीय विद्याभवन, चौपाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे.