सडपातळ शरीर, बसलेले गाल असा दिसायचा तारक मेहता मालिकेतला अभिनेता,ओळखणंही कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:24 PM2022-01-04T18:24:18+5:302022-01-04T18:26:47+5:30
aarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतल्या भूमिकेनेच रसिक कलाकारांना जास्त ओळखतात.यामध्ये प्रत्येक कलाकाराची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. या शोमध्ये बरेच कॅरेक्टरची रिप्लेसमेंट्स झाली असली तरी टीआरपीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) गेल्या 13 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. छोट्या पडद्यावरची रसिकांची आवडती मालिका आहे. एपिसोड जुने असो किंवा नवीन प्रत्येक भाग तितक्याच आवडीने पाहिले जातात. मालिकेतले सगळेच कलाकार आज घराघरात प्रसिद्ध आहे. मालिकेतल्या भूमिकेनेच रसिक कलाकारांना जास्त ओळखतात.यामध्ये प्रत्येक कलाकाराची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. या शोमध्ये बरेच कॅरेक्टरची रिप्लेसमेंट्स झाली असली तरी टीआरपीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
मालिकेतले सगळेच कलाकार सोशल मीडियावर प्रचंड एक्टीव्ह आहेत. त्यांचे फोटो व्हिडीओ काही खास आठवणी ते चाहत्यांसह शेअर करत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकाराचा आहे, जो गेल्या 13 वर्षांपासून शोमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा फोटो दुसर्या तिसर्या कोणाचा नसून तो आहे शैलेश लोढा (Shailesh Lodha) म्हणजेच सगळ्यांचा लाडका तारक मेहताचा आहे.
फोटो पाहून तुम्हीही थोड्या वेळासाठी विचारात पडला असाल. मात्र हा फोटो स्वतः शैलेश लोढा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून खास कॅप्शनही दिले आहे. या फोटोमध्ये शैलेश लोढा यांची शरिरयष्टीही खूपच बारिक दिसत आहे. पूर्वीपेक्षा शैलेश लोढा आता खूप रुबाबदार दिसतात. इतक्या वर्षात त्यांच्यात किती बदल झाला आहे हेच या फोटोंवरुन स्पष्ट होते.
शैलेश लोढा यांचा हा फोटो तारक मेहता का उल्टा चष्मा सुरू होण्यापूर्वीचा म्हणजेच 2008 पूर्वीचा आहे. शोमध्ये शैलेश लोढा लेखक तारक मेहताच्या भूमिकेत दिसत आहे जो जेठालालचा चांगला मित्र आहे. त्याची व्यक्तिरेखा आणि या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. याच कारणामुळे शोमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेलाही खूपच पसंत केले जाते.शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारण्यासाठी शैलेश लोढा यांना तगडे मानधन मिळते. एका एपिसोडसाठी 32 हजार रुपये मानधन त्यांना मिळते. ते एका महिन्यात 20 ते 21 दिवस काम करतात.