'चतुर चोर' ठरणार राणादा-अंजलीची जोडी; मालिकेनंतर पहिल्यांदाच सिनेमात करणार एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:56 PM2022-08-16T18:56:05+5:302022-08-16T18:56:47+5:30

Hardeek joshi: हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाचं लंडनमध्ये चित्रीकरण पार पडलं असून या चित्रपटात दिग्गज कलाकार झळकले आहेत.

upcoming marathi movie Chatur Chor hardeek joshi and akshaya deodhar first movie | 'चतुर चोर' ठरणार राणादा-अंजलीची जोडी; मालिकेनंतर पहिल्यांदाच सिनेमात करणार एकत्र काम

'चतुर चोर' ठरणार राणादा-अंजलीची जोडी; मालिकेनंतर पहिल्यांदाच सिनेमात करणार एकत्र काम

googlenewsNext

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली जोडी म्हणजे राणादा आणि अंजली. अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) आणि अक्षया देवधर  (akshaya deodhar) ही जोडी मालिकेत एकत्र झळकल्यानंतर आता सिनेमातही एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे या दोघांचाही हा डेब्यू सिनेमा असून पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. विशेष म्हणजे नुकतंच त्यांच्या या नव्याकोऱ्या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे.

हार्दिक आणि अक्षया लवकरच 'चतुर चोर' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाचं लंडनमध्ये चित्रीकरण पार पडलं असून या चित्रपटात दिग्गज कलाकार झळकले आहेत.

हार्दिक-अक्षयाची मुख्य भूमिका असलेल्या 'चतुर चोर' या चित्रपटाची कथा नेमकी कशी असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, हळूहळू करत या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीवरील पडदा दूर होणार आहे. अमोल गोळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. 
 

दरम्यान, लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडी 'चतुर चोर' मधला चतुर चोर नेमका कोण असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेली हार्दिक-अक्षयाची जोडी आता रुपेरी पडद्यावरही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या जोडीला सिनेमात एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह प्रीतम कागणेदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. 
 

Web Title: upcoming marathi movie Chatur Chor hardeek joshi and akshaya deodhar first movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.