Urfi Javedला दाखवणार होता प्रायव्हेट पार्ट; नंबर लीक करून अभिनेत्रीने त्याचा घेतला असा क्लास!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:20 PM2022-10-14T16:20:52+5:302022-10-14T16:22:33+5:30
सोशल मीडियाचा पारा चढवणारी अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियाचा पारा चढवणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर उर्फी तिच्या अनोख्या शैलीमुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिचे जेवढे चाहते आहेत तितकेच ट्रोलर्स देखील असल्याचे पाहायला मिळते. ड्रेसिंग सेन्समुळे ती अनेकवेळा ट्रोल झाली आहे. बिग बॉस ओटीटीची माजी स्पर्धक उर्फी कधी काय परिधान करेल याचा अंदाज लावणेही कठीण आहे. प्रत्येक वेळी अभिनेत्री तिच्या नवीन आणि अनोख्या ड्रेसने लोकांना आकर्षित करत असते. कधी फुले तर कधी शरीराला रंग लावून फोटोशूट करणारी उर्फी जावेद अनेकवेळा अडचणीत सापडली आहे.
दरम्यान, उर्फी जावेदने ट्रोलर्सकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. परंतु कधीकधी नेटकरी मर्यादा ओलांडतात तेव्हा अभिनेत्री त्यांना चोख उत्तर देत असते. याचाच एक प्रत्यय अलीकडे पाहायला मिळाला आहे. या ट्रोलर्सच्या यादीत काही लोक असे आहेत जे गलिच्छ मानसिकतेने भरलेले आहेत. यावेळी उर्फीचा सामना अशाच एका व्यक्तीसोबत झाला. ती व्यक्ती अभिनेत्रीला वारंवार फोन करून अश्लील वक्तव्य करून त्रास देण्याचा प्रयत्न करत होती, पण अशा लोकांची खिल्ली कशी उडवायची हे उर्फीला चांगलेच ठाऊक आहे. तिने या व्यक्तीला दिलेले उत्तर पाहून सर्वजण उर्फीचे कौतुक करत आहे. तिने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे संबंधित व्यक्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
फोनवर करत होता अश्लील वक्तव्य
या व्यक्तीने उर्फीला फोन करून अतिशय अश्लील गोष्टींबाबत भाष्य केले. तसेच त्याच्या प्रायव्हेट पार्टविषयी देखील त्याने उल्लेख केला. यामुळे नाराज झालेल्या उर्फीने कॉलरच्या नंबरचा स्क्रीनशॉट काढला आणि तो तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. या स्क्रीनशॉटसोबत तिने लिहिले की, "तुम्ही काहीही असाल, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही मला फोन करून किंवा लैंगिक गोष्टींबाबत बोलून त्रास द्याल तर असे अजिबात होणार नाही. मी नक्कीच पोलीस केस करेन."
अभिनेत्रीने चाहत्यांना घटनेची माहिती देताना म्हटले, "तुम्हाला जर खरंच कंटाळा येत असेल तर कृपया याला कॉल करा आणि त्याच्या आवडत्या गोष्टींबाबत बोला. त्याला त्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलायला खूप आवडते." आता अभिनेत्रीने केलेल्या या कृत्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. खरं तर यापूर्वी देखील उर्फीसोबत अशा घटना घडल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे उर्फीने अशा लोकांना न घाबरता वेळोवेळी उघडपणे यावर भाष्य केले आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने सांगितले होते की, एकदा तिला एका वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन करण्यास भाग पाडण्यात आले होते. वेबसीरिजच्या निर्मात्याने तिला याबद्दल आधी कोणतीही माहिती दिली नाही, परंतु जेव्हा ती शूटिंगदरम्यान सेटवर पोहोचली तेव्हा लोकांनी तिला यासाठी फोर्स कराला सुरूवात केली.
घरी पाठवले होते गुंड
याबद्दल बोलताना उर्फी म्हणाली होती की, "त्यांना माहिती आहे की माझ्या मागे कोणी नाही आहे आणि ते याचाच फायदा घेत होते. अखेर मी ही वेबसीरिज करण्यास नकार दिला आणि लगेच निघून गेले पण प्रकरण इथेच संपले नाही. जेव्हा मी सेटवर गेले नाही तेव्हा त्यांनी गुंडांना माझ्या घरी पाठवले होते. तेव्हा सुदैवाने मी तिथे नव्हती."