आठवडाभर या कारणामुळे चर्चेत राहिली उर्मिला मातोंडकर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 09:00 PM2019-04-07T21:00:00+5:302019-04-07T21:00:01+5:30
उर्मिला ही एकेकाळची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. तिला त्यावेळी चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या अभिनयावर अनेकजण आजही फिदा आहेत.
उर्मिला मातोंडकरला बॉलिवूडची रंगिला गर्ल म्हटले जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण उर्मिला गेल्या काही वर्षांपासून लाइमलाईटपासून दूर आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली नव्हती. पण सध्या उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्मिला मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. सध्या ती तिचा जोरदार प्रचार करत आहे. मुंबईच्या रस्त्यावरून फिरताना तिला पाहायला मिळत आहे.
All the people who came out to support me at Dambar Road, Borivali West, you are my true STRENGTH. My heartfelt gratitude to all of you. 🙏 Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulagipic.twitter.com/8aPlSD3T65
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) April 4, 2019
उर्मिला ही एकेकाळची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. तिला त्यावेळी चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या अभिनयावर अनेकजण आजही फिदा आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष भेटायला मिळतेय, तिच्याशी बोलता येईल या विचारानेच तिचे अनेक चाहते खुश झाले आहेत. त्यामुळे उर्मिलाच्या प्रचाराला हजेरी लावून ते तिच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत.
My heartiest thank you to the citizens of Gorai for the warmest welcome and unconditional support you have offered. 😇 🙏 Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulagipic.twitter.com/hxv4ATsYl3
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) April 3, 2019
उर्मिलाने देखील तिच्या प्रचाराला फिल्मी तडका दिला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळेच उमेदवार प्रचार करत आहेत. पण उर्मिलाच्या प्रचाराची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. कारण उर्मिला प्रचारादरम्यान कधी गाताना तर कधी वडापाव खाताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर तिने मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा देखील चालवली. उर्मिलाच्या या वेगळ्या रूपाची सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
I stand for you, with you. My people of Rawalpada, Dahisar (E) Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulagi 🙏🏼😇 pic.twitter.com/5K8Y55sJbw
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) April 1, 2019
उर्मिला काही दिवसांपूर्वी प्रचारासाठी बोरीवली परिसरात फिरत होती. त्यावेळी प्रचार करत असतानाच ती एका वडा पावच्या गाडीच्या जवळ गेली. मुंबईचा वडा पाव हा जगभरात फेमस आहे. उर्मिलाला देखील हा वडा पाव चाखायचा मोह आवरला नाही आणि तिने लगेचच वडापावची ऑर्डर दिली आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिने वडा पावचा मनसोक्त आनंद लुटला. एवढेच नव्हे तर त्यानंतर वडा पाव किती चविष्ट आहे हे देखील ती सांगायला विसरली नाही.
Mumbaichi Mulgi enjoying Mumbaicha tasty Vadapav. Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulagipic.twitter.com/YlJFKgKmXS
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) April 1, 2019
उर्मिला ही प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने तिचा प्रवास हा नेहमीच महागड्या गाड्यांमधूनच होत असतो. पण प्रचाराच्या निमित्ताने तिने काही रिक्षावाल्यांसोबत नुकत्याच गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर एरव्ही चार चाकीच्या प्रेमात असलेल्या उर्मिलाने रिक्षा देखील चालवली.
Interacting with the Auto-rickshaw walas, the lifeline of our city in gorai. Such a wonderful experience. 🙏🏼😇🇮🇳 #AapliMumbaichiMulagi@INCMumbaipic.twitter.com/PWbUZATVst
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) March 31, 2019
उर्मिला प्रचारादरम्यान तिच्या भागातील देवस्थांना देखील भेट देत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर तिने बोरीवलीमधील साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच गुरूद्वारामध्ये जाऊन देखील तिने पाया पडल्या.
Feel so blessed,respected and loved 🙏😇🇮🇳 pic.twitter.com/PVzFr9E3UC
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) March 30, 2019
एवढेच नव्हे तर प्रचारादरम्यान उर्मिला गाताना देखील दिसली. प्रचारासाठी ती एका रहिवाशी इमारतीच्या परिसरात गेली होती. तिथे मोठ्यांसोबतच अनेक लहान मुले देखील उपस्थित होती. तिने तिथे उपस्थित असलेल्या मुलांसाठी एक खास गोष्ट करण्याचे ठरवले आणि हातात असलेल्या माईकवरून काही संवाद साधण्याआधी लकडी की काठी... काठी पे घोडो हे गाणे लहान मुलांसाठी गायले. उर्मिला आपल्यासाठी गात आहे हे पाहून लहान मुलांनी देखील तिला चांगलाच प्रतिसाद दिला. एक अभिनेत्रीमध्ये लपलेली एक गायिका यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाली. हे गाणे 1982 ला प्रदर्शित झालेल्या मासूम या चित्रपटातील असून या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
.@OfficialUrmila sings along with crowd, lakdi ki kathi, kathi pe ghoda...#ApnaTimeAayegaPakkapic.twitter.com/uycV8aLVPj
— AIPC - MUMBAI NORTH (@AipcMumbaiNorth) April 3, 2019