'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:12 AM2024-09-25T09:12:48+5:302024-09-25T09:13:06+5:30

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं होतं.

Urmila Matondkar Files For Divorce From Husband Mohsin Akhtar Mir After 8 Years Of Marriage | 'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल

'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल

Urmila Matondkar Divorce : 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar ) आणि मोहसिन अख्तर (Mohsin Akhtar) यांच्यात दुरावा आला असून त्यांनी घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. उर्मिलाने  प्रेमासाठी धर्म आणि वयाचे बंधन झुगारली.इतकंच नाही तर आपल्या करिअरची अथवा लोकांचीही पर्वा केली नव्हती.  पण, त्यांचा ८ वर्षांचा संसार अखेर मोडणार आहे. उर्मिला व मोहसिन या दोघांनीही याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसून त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समोर आलेले नाही.

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. आता लग्नाच्या ८ वर्षांनी त्यांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. ई टाइम्स'नुसार, उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. तर 'हिंदुस्तान टाईम्स'नुसार उर्मिला आणि मोहसिन यांचा घटस्फोट परस्पर अटींवर होत नसल्याचं म्हटलं आहे.  उर्मिला आणि मोहसिन यांच्यात काही काळापासून अडचणी असून दोघेही गेल्या काही काळापासून एकत्र राहत नसल्याचंही बोललं जात आहे. 


फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसिन यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. काश्मिरी असलेला मोहसिन अख्तर हा उर्मिलापेक्षा १० वर्ष लहान आहे. वयात मोठे अंतर असतानाही दोघांनी जेव्हा लग्न केलं. तेव्हा बरीच चर्चा झाली होती. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक आहे. त्याने झोया अख्तरच्या 'लक बाय चान्स' सिनेमात अभिनयही केला आहे. शिवाय, उर्मिलानेने २०१९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला होता. 

Web Title: Urmila Matondkar Files For Divorce From Husband Mohsin Akhtar Mir After 8 Years Of Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.