'मणिकर्णिका'मध्ये पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारणारा वैभव तत्त्वादी नव्या इनिंगसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:33 AM2018-12-24T10:33:37+5:302018-12-24T10:35:16+5:30

‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. 

Vaibhav Mantra, which is an integral part of Puran Singh's personality in 'Manikarnika', is ready for new innings | 'मणिकर्णिका'मध्ये पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारणारा वैभव तत्त्वादी नव्या इनिंगसाठी सज्ज

'मणिकर्णिका'मध्ये पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारणारा वैभव तत्त्वादी नव्या इनिंगसाठी सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्दे 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' हा सिनेमासुद्धा नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. वैभवने आपल्या निर्मितीसंस्थेची स्थापना केली आहे.वैभव आणि अंकिता हे दोघेही प्रचंड अध्यात्मिक आहेत.

मराठी इंडस्ट्रिमधला चॉकलेटबॉय वैभव तत्ववादी आणि हिंदी टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवलेली अंकिता लोखंडे यांची जोडी आगामी हिंदी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. 

कंगना राणावत हिची मुख्य भूमिका असलेली मणिकर्णिका या चित्रपटात ही नवी जोडी एकत्र येणार असून या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान चांगलीच मैत्री झाली असल्याची चर्चा आहे. एकत्र काम करताना त्यांच्यात चांगलीच मैत्री निर्माण झाली. वैभव म्हणतो, ‘आम्ही दोघंही प्रचंड फुडी आहोत. आम्ही एकत्र असलो की आमचं डाएट कुठल्या कुठे पळतं. शूटिंग दरम्यान आम्ही दालबत्ती, गाजरचा हलवा आणि आईस्क्रीमवर ताव मारला होता. अलसिसार इथं आम्ही खास हे पदार्थ खाण्यासाठी गेलो होतो. जयपूरपासून अलसिसार हे तीन तासावर आहे. केवळ दालबत्ती आणि आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही तीन तास प्रवास करून गेलो.’ 

एवढंच नव्हे तर वैभवने एक नवी गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी सांगितली आहे. वैभव आणि अंकिता हे दोघेही प्रचंड अध्यात्मिक आहेत. तो म्हणतो यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही, मात्र आम्ही दोघं एकत्र असलो की आमच्यात अध्यात्मिकतेवर बरीच चर्चा होते. श्री श्री रविशंकर आणि सद्गुरुंची बरीच पुस्तकं वाचली आहेत. त्यामुळे आम्ही अध्यात्मिक विषयावर खूपवेळ गप्पा मारतो. 


अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा वैभव आपल्या नवीन इनिंगसाठी सज्ज झाला आहे. वैभवचा अभिनयापासून सुरु झालेला प्रवास त्याला निर्मितीक्षेत्राकडे घेऊन आला आहे. वैभवने आपल्या निर्मितीसंस्थेची स्थापना केली आहे. "ऑटम ब्रीझ फ्लिमझ" असे त्यांच्या निर्मितीसंस्थेचे नाव आहे. या संस्थेअंतर्गत सिनेमाच्या निर्मिती ते व्यवस्थापन अशी कामे पार पडणार आहेत.

याशिवाय वैभवचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' हा सिनेमासुद्धा नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमात वैभव तत्त्वादीच लुक डोक्याला मुंडासं बांधलेला दिसणार असून, सिनेमामध्ये  लक्ष्मीबाई यांच्या लढाऊ तुकडीतील एक योंद्धा म्हणून त्याने पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात वैभवच्या बायकोची झलकारी बाईची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेन  साकारली आहे. वैभव आणि अंकिता ह्या जोडीवर एक खास गाणं देखील सिनेमात चित्रित करण्यात आलं आहे. वैभवने या सिनेमात कंगना रानौत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांच्यासोबत काम केले आहे. वैभवच्या या नव्या इनिंगबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

Web Title: Vaibhav Mantra, which is an integral part of Puran Singh's personality in 'Manikarnika', is ready for new innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.