वैशालीने केला वाढदिवस साजरा
By Admin | Updated: April 29, 2017 01:08 IST2017-04-29T01:08:03+5:302017-04-29T01:08:03+5:30
प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतचा नुकताच वाढदिवस झाला. तिने तिचा हा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करता अतिशय साधेपणाने

वैशालीने केला वाढदिवस साजरा
प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतचा नुकताच वाढदिवस झाला. तिने तिचा हा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करता अतिशय साधेपणाने तिच्या घरातल्यांसोबत साजरा केला आणि तिने याबाबतची एक पोस्टदेखील फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केली आहे. तिने तिच्या आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला असून, या फोटोत तिची आई तिचे औंक्षण करत असल्याचे आपल्याला दिसते आहे. या फोटोसोबत तिने पोस्टदेखील लिहिली आहे. त्यात ती म्हणते की, ‘मी माझा वाढदिवस अतिशय साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने माझ्या आईसोबत साजरा केला. यापेक्षा अधिक मी देवाकडे काय मागू शकते? मला वाढदिवसाला भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच माझ्यासोबत असू देत, एवढीच एक माझी इच्छा आहे.