भारतात गांजा वैध करा, अभिनेता उदय चोप्राचे ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:28 PM2018-09-14T21:28:49+5:302018-09-14T21:29:58+5:30
हा एक महसूल मिळवण्याचा मोठा स्त्रोत आहे आणि वैद्यकिय क्षेत्रातही याचे फायद्याचे आहे, असे त्याचे म्हणणे या ट्विटमध्ये मांडले आहे.
मुंबई - भारतात गांजा वैध ठरवण्यात आला पाहिजे असे बेताल मत अभिनेता उदय चोप्राने ट्विटरवर व्यक्त केले आहे. हा एक महसूल मिळवण्याचा मोठा स्त्रोत आहे आणि वैद्यकिय क्षेत्रातही याचे फायद्याचे आहे, असे त्याचे म्हणणे या ट्विटमध्ये मांडले आहे.
अभिनेता उदय चोप्राने आपल्या ट्विटर केलेल्या ट्विटमध्ये मला भारतात गांजा वैध केला पाहिजे असं वाटतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा आपल्या संस्कृतीचा एक घटक आहे. याला जर वैध ठरवण्यात आले आणि त्यावर कर बसवला तर हा महसूल मिळवण्याचा मोठा स्रोत निर्माण होऊ शकतो. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याचे खूप काही वैद्यकिय लाभ आहेत असं नमूद केले आहे. भारतात गांजा या अमली पदार्थाचे सेवन बेकायदेशीर आहे. मात्र, दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा असलेला अभिनेता उदय याला वैध ठरवणे बुध्दीमत्तेचे पाऊल ठरेल असे त्याला वाटत असावे.
I feel India should legalize marijuana. Firstly, It’s part of our culture. Secondly, I think if legalized and taxed it can be a huge revenue source. Not to mention it will remove the criminal element associated with it. Plus and most importantly it has a lot of medical benefits!
— Uday Chopra (@udaychopra) September 13, 2018