झी युवावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:41 AM2019-08-02T11:41:28+5:302019-08-02T12:02:41+5:30

झी युवा वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. विविध विषयांवर आधारित असलेल्या या मालिकांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळते.

Vartul tv serial on zee yuva will say good bye | झी युवावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी युवावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

googlenewsNext

झी युवा वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. विविध विषयांवर आधारित असलेल्या या मालिकांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळते. नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरु झालेली 'वर्तुळ' ही मालिका याच मालिकांपैकी एक आहे. मीनाक्षीच्या आयुष्याचं हे वर्तुळ, आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिने मीनाक्षीची भूमिका उत्तमरित्या निभावली. मीनाक्षीच्या आयुष्यावर असलेली भूतकाळाची सावली व त्यामुळे घडणारे प्रसंग यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे हे 'वर्तुळ' आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 

सातत्याने वेगवेगळी वळणे घेणारी या मालिकेची कथा, प्रेक्षकांना फारच भावली आहे. मीनाक्षीच्या आयुष्यातील चढउतार, अनेक बरे-वाईट प्रसंग प्रेक्षकांनी अनुभवले. या सर्व प्रवासात प्रेक्षक या मालिकेशी भावनिकरित्या जोडले गेले. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करून झाला आहे. या चित्रीकरणानंतर सारे कलाकार सुद्धा सेटवर भावुक झाले होते. मालिकेचा शेवट नेमका कसा असेल, याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. 'अनेक खाचखळग्यांनी भरलेल्या या वर्तुळाचा शेवट गोड होणार का?' याचं उत्तर प्रेक्षकांना ६ ऑगस्टला मिळणार आहे. 

'युवा सिंगर, एक नंबर' हा नवाकोरा कथाबाह्य कार्यक्रम वर्तुळ या मालिकेची जागा घेणार आहे. नवी संकल्पना असलेला हा कार्यक्रम, 'वर्तुळ' मालिका संपल्यानंतर बघायला मिळणार असल्याने, 'एका डोळ्यात आसू, तर एका डोळ्यात हसू' अशी प्रेक्षकांची स्थिती झाली आहे. मालिकेचा शेवट नेमका कसा होणार, हे पाहण्यासाठी, बघायला विसरू नका, 'वर्तुळ' ६ ऑगस्टला, रात्री ९ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वर!!!!

Web Title: Vartul tv serial on zee yuva will say good bye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.