वरुण धवनला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षे झाली पूर्ण, फॅन्ससाठी लिहिली 'ही' स्पेशल पोस्ट
By गीतांजली | Published: October 19, 2020 07:30 PM2020-10-19T19:30:00+5:302020-10-19T19:34:58+5:30
वरुण धवनने या निमित्ताने सोशल मीडियावर अकाऊंटवरवरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता वरुण धवनला इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2012ला रिलीज झाला होता. वरुण धवनने या निमित्ताने सोशल मीडियावर अकाऊंटवरवरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.
It’s been 8 years since this journey began between me and u. Thank u for believing in me when no one did. I remember every city I toured. The signs, letters, gifts, tattoos and most Importantly the love. pic.twitter.com/RCHfnFdGzX
— VarunDhawan (@Varun_dvn) October 19, 2020
वरुण धवनने सोशल मीडियावर शेअर केला फोटो
वरुणने सोमवारी(आज)आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिनेमा प्रमोशनच्या दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना वरुण लिहितो, तुमचा आणि माझा हा प्रवास सुरु होऊन आठ वर्षे झाली आहेत. जेव्हा कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्यात त्याबद्दल धन्यवाद. मला प्रत्येक शहरातल्या आठवणी लक्षात आहेत, या दरम्यान मला पत्र, गिफ्ट्स, टॅटू आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रेम मिळाले. जेव्हा मी रडलो तेव्हा तुम्ही रडलात, मी हसले, तुम्ही हसलात पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी केलेले प्रत्येक गोष्टीचे तुम्हीही नेहमी कौतूक केलात. सुरक्षित रहा, सगळ्यांना माझं प्रेम, वरुण.
When I cried u cried when I laughed u laughed but most importantly I know u cared for everything I did and that’s the most important thing. Be safe love Varun. pic.twitter.com/PyIcgGiQsq
— VarunDhawan (@Varun_dvn) October 19, 2020
वरुण धवनने दिले अनेक हिट सिनेमा
बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यावर वरुण धवनने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले. वरुणने आठ वर्षांच्या करिअरमध्ये, मैं तेरा हिरो, बलापूर, कलंक, अक्टूबर, दिलावाले आणि सुई धागे सारखे अनेक सिनेमे दिले.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर शेवटचा वरुण 'स्ट्रीट डान्सर 3'मध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे. लवकरच त्याचा 'कुली नंबर 1' सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.