तुम्ही वाचली आहे का, श्रद्धा कपूर आणि वरुण धवनची क्यूट प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 02:54 PM2020-01-15T14:54:11+5:302020-01-15T15:03:35+5:30

वरुण आणि श्रद्धा यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा ही अगदी फिल्मी आहे. त्यांनीच दोघांनी नुकतेच याविषयी सांगितले.

Varun Dhawan reveals childhood crush on Shraddha Kapoor | तुम्ही वाचली आहे का, श्रद्धा कपूर आणि वरुण धवनची क्यूट प्रेमकथा

तुम्ही वाचली आहे का, श्रद्धा कपूर आणि वरुण धवनची क्यूट प्रेमकथा

googlenewsNext
ठळक मुद्देश्रद्धा आणि तू एकमेकांकडे कधी एकमेकांविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या नाहीस का असे विचारले असता वरुणने सांगितले की, मी अशा वयात होतो, ज्या वयात मुलांना मुली अजिबात आवडत नाहीत.

श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांचा स्ट्रीट डान्सर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू असून या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी या चित्रपटाची टीम सोडत नाहीये. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने वरुण आणि श्रद्धा यांनी सिद्धार्थ काननला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या दरम्यान वरुण आणि श्रद्धाने कबूल केले की, त्या दोघांना लहानपणी एकमेकांवर क्रश होते. 

वरुणने या मुलाखतीत सांगितले की, आमची बालपणाची स्टोरी ही अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे. आम्ही लहान असताना एकमेकांशी प्रचंड भांडायचो. पण असे असले तरी आम्ही दोघे एकमेकांना आवडायचो. 

श्रद्धा आणि तू एकमेकांकडे कधी एकमेकांविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या नाहीस का असे विचारले असता वरुणने सांगितले की, मी अशा वयात होतो, ज्या वयात मुलांना मुली अजिबात आवडत नाहीत. मी खूपच लहान होतो. आठ-नऊ वर्षांचा असेन, त्यावेळी या गोष्टी कुठे कळायच्या?

वरुणने प्रपोज केले असते तर श्रद्धाने त्यावेळी काय उत्तर दिले असते असे सिद्धार्थने विचारले असता तिने सांगितले की, मला वरुण फक्त आवडायचा. मी त्या वयात यापुढे कशाचा विचारच करू शकत नव्हते. 

वरुण सांगतो, आमची प्रेमकथा आम्ही आठ-नऊ वर्षांची असताना सुरू झाली होती. पण त्यानंतर ही प्रेमकथा संपून आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. अगदी घट्ट मैत्री...

Web Title: Varun Dhawan reveals childhood crush on Shraddha Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.