OMG! ‘कुली नंबर 1’चे IMDb रेटींग पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा घेतली वरूण धवनची मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:25 AM2020-12-29T11:25:35+5:302020-12-29T11:28:56+5:30

म्हणाले, कुली नंबर वन नव्हे, कुली नंबर झिरो

Varun Dhawan, Sara Ali Khan Starring Coolie No 1 Gets Worst-Rating of 1.4 on IMDB | OMG! ‘कुली नंबर 1’चे IMDb रेटींग पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा घेतली वरूण धवनची मजा

OMG! ‘कुली नंबर 1’चे IMDb रेटींग पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा घेतली वरूण धवनची मजा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कुली नंबर 1’ हा सिनेमा वरूणचे डॅडी डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. यावरूनही नको ते मीम्स व्हायरल झालेत.

ख्रिसमसच्या मुहूर्तावर ओटीटीवर वरूण धवन व सारा अली खानचा ‘कुली नंबर 1’ हा सिनेमा रिलीज झाला आणि  या सिनेमाने प्रेक्षकांची पुरती निराशा केली. इतकी रिलीजनंतर काही तासांत या सिनेमाची सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली गेली.  ट्विटरवर  तर मीम्सचा पूर आला. आता या सिनेमाला केवळ 1.4 रेटींग मिळाले आहे. या रेटींगनंतर युजर्स पुन्हा एकदा या चित्रपटाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि समीक्षकांच्या रेटींगच्या आधारावर आयएमडीबीने ‘कुली नंबर 1’ला 1.4 रेटींग दिले आहे. ‘कुली नंबर 1’ला सलमान खानच्या ‘रेस 3’पेक्षाही कमी रेटींग मिळाले आहे. सलमानच्या ‘रेस 3’ ला 1.9 रेटींग मिळाले होते. ‘कुली नंबर 1’ने त्यापेक्षाही कमी रेटींग मिळवले.

‘कुली नंबर 1’ हा सिनेमा वरूणचे डॅडी डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. यावरूनही नको ते मीम्स व्हायरल झालेत. या चित्रपटातील वरूण धवनच्या ट्रेन सीनची तर आत्तापर्यंत खिल्ली उडवली जात आहे. या सीनमध्ये वरूण धवन रूळांवर उभ्या असलेल्या छोट्या मुलाला वाचवतो. या सीनमधील लॉजिक आणि सायन्सवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुळात गोविंदाच्या या आयकॉनिक सिनेमाचा रिमेक बनवणे हेच नेटकऱ्यांना पटलेले नाही. गोविंदा व करिश्माच्या ‘कुली नंबर 1’ची चर्चा आजही होते. मात्र डेव्हिड धवनने या सिनेमाचा रिमेक बनवून पुरती वाट लावली, असे चाहते म्हणत आहेत.

Coolie No 1 Twitter Review: बेटा तुमसे ना हो पायेगा...! वरूण-साराचा सिनेमा पाहून चाहते ‘कोमात’

Web Title: Varun Dhawan, Sara Ali Khan Starring Coolie No 1 Gets Worst-Rating of 1.4 on IMDB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.