Ved Marathi Movie : मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:20 PM2023-01-06T15:20:30+5:302023-01-06T15:21:58+5:30

३० डिसेंबर रोजी वेड संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आज सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे.

ved-box-office-collection-riteish-deshmukh-genelia-dsouza-magic-circus-avatar-out | Ved Marathi Movie : मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल

Ved Marathi Movie : मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल

googlenewsNext

 Ved Marathi Movie : ‘वेड’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकजी आहेत. साऊथच्या ‘मंजिली’ या सिनेमाचा रिमेक आहे मात्र रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलियाच्या (Genelia) जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. ३० डिसेंबर रोजी वेड संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आज सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. बॉक्सऑफिसवर 'वेड'ला मिळणारा प्रतिसाद पाहता थिएटर मालकांनी 'सर्कस' या बॉलिवूड आणि 'अवतार २' या हॉलिवुड सिनेमाचे स्क्रीनिंगही थांबवले आहे. सध्या बॉक्सऑफिसवर 'वेड' या मराठी सिनेमाचाच डंका आहे.

‘वेड' राज्यभरातील 250 स्क्रिनवर हा चित्रपट रिलीज झाला असून त्याला 1000 शो मिळाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होताच राज्यातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. वेड ला १ आठवडा झाल्यानंतर चित्रपटाने किती कमाई केली याचा आकडा समोर आला आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट  तरण आदर्श यांनी ट्वीट करून ‘वेड’च्या कमाईचे आकडे जाहीर केलेत.  

'वेड'ने सोमवार ते शुक्रवार या वारीही चांगला गल्ला जमवला. शुक्रवारी २.२५ कोटी, शनिवारी ३.२५ कोटी, रविवारी ४.५० कोटी, सोमवारी ३.०२ कोटी, मंगळवारी २.६५ कोटी, बुधवारी २.५५ , गुरुवारी २.४५ कोटीचा बिझिनेस केला. 

‘वेड’ या सिनेमात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत.या  सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुख याने दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे. यामुळेच बॉलिवुड आणि हॉलिवुडच्या दोन्ही बिग बजेट सिनेमांना वेडने धोबीपछाड केले.

Web Title: ved-box-office-collection-riteish-deshmukh-genelia-dsouza-magic-circus-avatar-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.