व्यंकय्या नायडूंनी केलं मृणालच्या 'सीता रामम्'चं कौतुक; म्हणाले "प्रत्येकाने हा चित्रपट.."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:33 PM2022-08-20T12:33:42+5:302022-08-20T12:47:07+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या 'सीता रामम'चं माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूनी कौतुक केलं आहे. हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Sita Ramam : साउथमधील अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan), पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूडअभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांचा 'सीता रामम' (Sita Ramam) हा चित्रपट गेल्या पाच ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला. चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये 60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मृणाल ठाकुरने साउथमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटचं कौतुक आता माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. व्यंकय्या नायडू यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सीता रामम या चित्रपटाच्या कथानकाचे आणि कलाकारांचे कौतुक केलं आहे.
माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं ट्वीट
व्यंकय्या नायडू यांनी एक ट्विट शेअर केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी तेलगू भाषेत 'सीता रामम'वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'सीता रामम' चित्रपट पाहिला. तांत्रिक विभाग आणि कलाकारांच्या समन्वयाने ही एक कलाकृती तयार करण्यात आली आहे. वीर सैनिक पार्श्वभूमी आधारित चित्रपट आहे. भावनांची उत्तमरित्या सांगड घालणारा हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा असाच आहे”.असं ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे.
पुढे त्यांनी लिहिलं, 'बऱ्याच दिवसांनी चांगला चित्रपट पाहिल्याचं ‘सिता रामम्’ बघितल्यानंतर मला जाणवलं. याशिवाय त्यांनी दिग्दर्शक श्री हनु राघवपुडी, निर्माता श्री अश्विनीदत आणि स्वप्ना मूव्ही मेकर्ससह चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केलं आहे.'
"సీతారామం" చిత్రాన్ని వీక్షించాను. నటీనటులు అభినయానికి, సాంకేతిక విభాగాల సమన్వయం తోడై చక్కని దృశ్యకావ్యం ఆవిష్కృతమైంది. సాధారణ ప్రేమ కథలా కాకుండా, దానికి వీర సైనికుని నేపథ్యాన్ని జోడించి, అనేక భావోద్వేగాలను ఆవిష్కరించిన ఈ చిత్రం ప్రతి ఒక్కరూ తప్పక చూడదగినది. pic.twitter.com/XGgxGGxVqF
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) August 17, 2022
सीता रामममध्ये मृणाल ठाकूरनं सीता तर दुलकर सलमानने राम ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदनानं आफरीन ही भूमिका साकारली आहे.