अच्छी बाते कर ली बहुत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 01:49 AM2016-05-12T01:49:00+5:302016-05-12T01:49:00+5:30

अभिनेता स्वप्नील जोशी मराठी इंडस्ट्रीमधला चॉकलेट हीरो म्हणून ओळखला जातो. पण ‘लाल इश्क’ या त्याच्या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा स्वप्नील पाहायला मिळणार आहे

Very good talks ... | अच्छी बाते कर ली बहुत...

अच्छी बाते कर ली बहुत...

googlenewsNext

अभिनेता स्वप्नील जोशी मराठी इंडस्ट्रीमधला चॉकलेट हीरो म्हणून ओळखला जातो. पण ‘लाल इश्क’ या त्याच्या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा स्वप्नील पाहायला मिळणार आहे. याबाबत स्वप्नीलने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...प्रश्न - स्वप्नील, तू गेल्या काही वर्षांपासून अनेक रोमँटिक चित्रपट करीत आहेस. ‘लाल इश्क’ या चित्रपटातही प्रेक्षकांना तुझ्यातील रोमँटिक हीरो पाहायला मिळणार आहे का?
4‘लाल इश्क’ या चित्रपटातही एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असली तरी इतर चित्रपटांमध्ये असणारी टीपिकल प्रेमकथा यात नाही. तसंच या चित्रपटातील नायकही खूप वेगळा आहे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला तो तुमच्या-आमच्यासारखाच आहे याची जाणीव होईल. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. प्रत्येक चित्रपटात नायक हा अतिशय चांगलाच दाखवला जातो. पण या चित्रपटातील नायक हा चांगला असण्यासोबतच वाईटदेखील आहे.
प्रश्न - या चित्रपटात तू नकारात्मक भूमिका साकारत आहेस अशी चर्चा आहे, हे खरे आहे का?
4चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो आपल्याला नकारात्मक दिसत असला तरी तो तसा नाहीये. केवळ आपल्यावर संकट आले तर त्याचा सामना न करता तो त्यात दुसऱ्याला पुढे करणारा असा आहे. ही व्यक्तिरेखा पूर्णपणे नकारात्मक नसली तरी एक वेगळा स्वप्नील प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लाँच झाल्यापासून सगळेच जण माझ्या भूमिकेविषयी अंदाज लावत आहेत याचा मला अधिक आनंद आहे. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना खरे काय ते कळेल.
प्रश्न - तुझ्या कम्फर्ट झोनपेक्षा ही भूमिका वेगळी असल्याने तुला भूमिकेचे टेन्शन आले होते का?
4मी संजय लीला भन्साली यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे त्यांच्या आॅफीसमधून चित्रपट करण्यासाठी मला फोन आल्यावर मी खूप खूश झालो होतो. पण मला ज्यावेळी माझ्या भूमिकेविषयी सांगण्यात आले, तेव्हा मला प्रचंड टेन्शन आले होते. ही भूमिका माझ्या इमेजपेक्षा खूप वेगळी असल्याने मी ही भूमिका स्वीकारू का, हा मला पहिला प्रश्न पडला होता. चित्रपट स्वीकारल्यानंतर मी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकेन का, हीदेखील मला शंका होती. पण माझ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना माझ्यावर प्रचंड विश्वास होता. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकलो आहे असे मला वाटते. चित्रीकरणाच्या सुरुवातीला तर मी प्रचंड घाबरलेलो होतो. पण चित्रीकरणाला सुरुवात झाल्यावर मी काम एन्यॉय करायला लागलो.
प्रश्न - संजय लीला भन्सालींसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
4संजय लीला भन्साली यांचे त्यांच्या कामाबद्दल असलेले पॅशन मला या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान पाहायला मिळाले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खरेतर कित्येक कोटींचे बजेट असलेले हिंदी चित्रपट बनवणाऱ्या संजय लीला भन्साली यांच्यासाठी हा मराठी चित्रपट खूपच छोटा होता. पण तरीही ते प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष देत होते. ही त्यांची गोष्ट मला प्रचंड आवडली.
प्रश्न - तू अतिशय फिट अभिनेता मानला जातोस, स्वत:ला फिट राखण्यासाठी तू काय करतोस?
4मी दररोज न चुकता व्यायाम करतो. तसेच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ््यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो. यामुळे शरीर अतिशय तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
प्रश्न - ‘कॉमेडी सर्कस’, ‘पापडपोल’ यांसारख्या हिट कार्यक्रमात काम करूनही सध्या तू हिंदी मालिकांपासून दूर आहेस, याचे कारण काय?
4हिंदी मालिकांमध्ये काम करायचे म्हटले तर तितका वेळ द्यावा लागतो. कोणत्याही मालिकेच्या चित्रीकरणाला दिवसातील १०-१२ तास लागतात. सध्या मी मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय व्यग्र असल्याने माझ्याकडे तितकासा वेळ नाही. खरंतर छोट्या पडद्यावर काम करणे म्हणजे एक फुल टाइम जॉब केल्यासारखे असते. तुम्ही यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला वेळ देऊ शकत नाही. या सगळ््या कारणांमुळेच सध्या मी मालिकांमध्ये काम न करणेच पसंत करीत आहे. पण मला एखादी खूपच चांगली भूमिका मिळाली तर मी नक्कीच हिंदी मालिकेत काम करेन.
प्रश्न - प्रेक्षकांना तुला हिंदी चित्रपटात कधी पाहायला मिळेल?
4हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला मिळतेय म्हणून कोणतीही भूमिका करायची असे मी कधीच करणार नाही. चांगला चित्रपट आणि चांगली भूमिका असल्याशिवाय हिंदीत काम करायचे नाही असे मी ठरवले आहे.

Web Title: Very good talks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.