'काम दे गं पोरी...' मराठी अभिनेत्यावर आली वाईट वेळ; 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:14 AM2023-07-10T09:14:35+5:302023-07-10T09:15:35+5:30

ओळखलंत का यांना? एकटेपणाला कंटाळून इच्छामरण तरी द्या अशी अवस्था त्यांची झाली आहे.

veteran actor manmohan mahimkar in trouble kokan hearted girl ankita walawalkar shares video | 'काम दे गं पोरी...' मराठी अभिनेत्यावर आली वाईट वेळ; 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला Video

'काम दे गं पोरी...' मराठी अभिनेत्यावर आली वाईट वेळ; 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला Video

googlenewsNext

मनोरंजनसृष्टीत जोवर तुम्हाला काम आहे तोवरच तुम्हाला पैसा, प्रसिद्धी मिळते. मात्र एकदा का तुम्ही प्रकाशझोतापासून दूर गेलात की तुम्हाला कोणीच ओळखत नाही. फिल्मइंडस्ट्रीत अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांच्यावर आज वाईट वेळ आली आहे. कोणी लग्न न केल्याने एकटेच आहेत तर कोणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. मराठी फिल्मइंडस्ट्रीतील वास्तव दाखवणारी घटना समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर (Manmohan Mahimkar) ज्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटात काम केले आहे ते आज काम मागण्यासाठी धडपडत आहे. इतकंच नाही तर एकटेपणाला कंटाळून इच्छामरण तरी द्या अशी अवस्था त्यांची झाली आहे. मराठी इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरने त्यांचा व्हिडिओ पोस्ट करत वास्तव समोर आणलं आहे.

अंकिता वालावलकर गिरगाव येथे एका शूटसाठी गेली असता तिची भेट माहिमकर काकांशी झाली. यानंतर त्यांनी की काही व्यथा मांडली यामुळे अंकितालाही धक्का बसला. व्हिडिओतून अंकिताने ही माहिती दिली आहे. ती सांगते,'गिरगावमध्ये माझं एक शूट होतं आणि ते शूट सुरु असताना मला माहिमकर काका भेटले. ज्यांना मी स्क्रीनवरती लहानपणापासून बघितलं आहे. मी त्यांना विनंती केली की आमच्या शूटमध्ये तुम्ही याल का. ते लगेच तयार होऊन आले सुद्धा.'

काय म्हणाले माहिमकर?

अंकिता म्हणाली, 'जाता जाता ते मला एकच म्हणाले मुली मला काम देशील का गं. मला कामाची खूप गरज आहे. त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून मला फार वाईट वाटलं. एका कलाकाराची अशी अवस्था आहे की ते मला काम मागत होते. माझं लग्न झालं नाहीए वेळ घालवायला कुटुंब नाहीए मला इच्छामरण सुद्धा चालेल पण त्याचा अर्ज इथे भारतात देऊ शकत नाहीए. मला काम द्या जेणेकरुन माझा वेळ जाईल आणि मी काहीतरी त्यातून पैसे कमवू शकेल.मला फक्त पैसे नकोत तर काम करायचं आहे.

अंकिता पुढे म्हणाली, 'त्यांची या वयातली ही वाक्य ऐकून वाटलं खरंच बरंच शिकण्यासारखं आहे. मी त्यांना सांगितलं की मी एवढी मोठी नाहीए की मी तुम्हाला काम देऊ शकेल पण माझ्या संपर्कात असलेले इंडस्ट्रीतील लोकांपर्यंत मी तुमचा हा मेसेज नक्की पोहोचवेन. तुम्हाला नक्की काम मिळेल जेणेकरुन तुमचा वेळ जाईल. तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाईल'

जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गोलमाल सारख्या काही मराठी सिनेमांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या आहेत. ते गिरगावला असतात. मात्र आज मराठी इंडस्ट्री त्यांना विसरलेली दिसतीए. जगण्यासाठी त्यांची अक्षरश: धडपड सुरु आहे. अंकिताने या व्हिडिओतून मनोरंजनविश्वातील हे वास्तव समोर आणलं आहे. आता मराठी इंडस्ट्रीतून कोण पुढे येतं ते बघणं महत्वाचं आहे.

Web Title: veteran actor manmohan mahimkar in trouble kokan hearted girl ankita walawalkar shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.