मुमताज म्हणतात मी जिवंत आहे, फेक बातम्यांवर केला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 10:08 AM2020-05-23T10:08:13+5:302020-05-23T10:12:04+5:30

मुमताज यांनी समोर येऊन मी जिवंत असून अशा कोणत्याही अफवा पसरवू नका असे लोकांना आवाहन केले आहे. या व्हिडिओत त्या तंदुरुस्त आणि खूपच सुंदर दिसत आहेत.

Veteran actor Mumtaz dismisses death rumours PSC | मुमताज म्हणतात मी जिवंत आहे, फेक बातम्यांवर केला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

मुमताज म्हणतात मी जिवंत आहे, फेक बातम्यांवर केला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

googlenewsNext
ठळक मुद्देमुमताज यांची मुलगी तान्या माधवनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओत मुमताज अतिशय तंदुरुस्त दिसत असून या व्हिडिओद्वारे त्या सांगत आहेत की, मी जिवंत आहे... लोकांना वाटत आहे तितकी मी म्हातारी देखील झालेली नाहीये..

बॉलिवूड अभिनेत्री मुमताज सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या निधनाची अफवा सगळीकडे पसरली असून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहाणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मागील वर्षीदेखील मे महिन्यातच मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. काही दिवसांपूर्वी तर पंजाबच्या एका मंत्र्यांने देखील मुमताज यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली होती. पण आता मुमताज यांनी समोर येऊन मी जिवंत असून अशा कोणत्याही अफवा पसरवू नका असे लोकांना आवाहन केले आहे.

मुमताज यांची मुलगी तान्या माधवनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओत मुमताज अतिशय तंदुरुस्त दिसत असून या व्हिडिओद्वारे त्या सांगत आहेत की, माझ्या मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांवर प्रचंड प्रेम करते. पाहा... मी जिवंत आहे... लोकांना वाटत आहे तितकी मी म्हातारी देखील झालेली नाहीये...तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी आजही तितकीच सुंदर दिसते. या व्हिडिओसोबत तान्याने लिहिले आहे की, माझ्या आईकडून तिच्या सगळ्या फॅन्ससाठी हा खास संदेश... माझी आई आता संपूर्णपणे तंदुरुस्त असून तिचे आयुष्य खूपच चांगल्याप्रकारे जगत आहे. तरीही तिच्या निधनाची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरवली जात आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट करून ती आजारी असल्याचे सांगण्यात येत आहेत. ते फोटो खूप जुने आहेत. आईला कॅन्सर झाला होता, त्यावेळेचे ते फोटो आहेत. पण आता माझ्या आईची तब्येत पूर्णपणे चांगली असून ती खूपच छान दिसत आहे. ती ७३ वर्षांची असली तरी तिच्या सौंदर्याची आजही चर्चा आहे.

मुमताज यांना २००० मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. यावर कित्येक महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी या आजारावर पूर्णपणे मात केली असून गेल्या काही वर्षांपासून त्या लंडनमध्ये राहात आहेत. 

Web Title: Veteran actor Mumtaz dismisses death rumours PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumtazमुमताज