Jayakumari : 300 चित्रपटांत काम केलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची परिस्थिती अत्यंत बिकट; उपचारासाठी नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:24 PM2022-09-20T13:24:59+5:302022-09-20T13:34:05+5:30

Jayakumari : जयाकुमारी सध्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत आणि पैशांअभावी त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.

veteran actress Jayakumari admitted to government hospital pleading for financial help | Jayakumari : 300 चित्रपटांत काम केलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची परिस्थिती अत्यंत बिकट; उपचारासाठी नाहीत पैसे

फोटो - दैनिक भास्कर

googlenewsNext

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी जयाकुमारी या 1960 आणि 1970 च्या दशकात तमिळ आणि मल्याळम सिनेमांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ग्लॅमरस भूमिकांसाठी त्या ओळखल्या जायच्या. सध्या या किडनीशी संबंधित आजाराने ग्रासल्या असून उपचारासाठी त्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जयाकुमारी सध्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत आणि पैशांअभावी त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.

जयाकुमारी यांना चैन्नईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयामधील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे त्या मुलगा रोशनसोबत राहत आहेत. जयाकुमारी यांच्या पतीचे नाव नागापट्टिनम अब्दुल्ला होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी

रिपोर्टनुसार, जयाकुमारी सध्या त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत, कारण उपचारांसाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो आणि ती इतकी रक्कम देण्याच्या त्या स्थितीत नाहीत. त्यांना आशा आहे की, सिनेसृष्टीतील लोक त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येतील. यापूर्वी कठीण काळात असलेल्या सहकलाकारांना चिरंजीवी आणि रजनीकांत यांनी मदत केली होती.

जयाकुमारी यांचे चित्रपट

अभिनेत्रीने 1968 मध्ये 'कलेक्टर मालथी' या मल्याळम सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यांनी 'फुटबॉल चॅम्पियन'मध्ये प्रेम नझीर, 'नूत्रक्कू नूरू'मध्ये जयशंकर आणि 'मन्निना मागा'मध्ये डॉ राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'एन्गिरिंदो वंदल', 'हरमाना', 'नटरुक्कू नुरू', 'अनाथाई आनंदन' आणि इतर अनेक चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: veteran actress Jayakumari admitted to government hospital pleading for financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.