K Viswanath: ज्येष्ठ तेलुगू चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांचे निधन, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार अन् पद्मश्रीने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 08:10 AM2023-02-03T08:10:52+5:302023-02-03T08:11:08+5:30

K Viswanath passes away: पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले के.विश्वनाथ वाढत्या वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. ते ९२ वर्षांचे होते.

Veteran Telugu filmmaker K Viswanath passes away at 92 | K Viswanath: ज्येष्ठ तेलुगू चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांचे निधन, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार अन् पद्मश्रीने सन्मानित

K Viswanath: ज्येष्ठ तेलुगू चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांचे निधन, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार अन् पद्मश्रीने सन्मानित

googlenewsNext

शंकरभरणम, सागरा संगमम, स्वाती मुथ्यम आणि स्वर्ण कमलम यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेले दिग्गज तेलुगू चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांनी गुरुवारी हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले के.विश्वनाथ वाढत्या वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. ते ९२ वर्षांचे होते.

विश्वनाथ यांनी मद्रासमधील वाहिनी स्टुडिओसाठी ऑडिओग्राफर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. साउंड इंजिनिअर म्हणूनही काही काळ काम केलं. मग त्यांनी चित्रपट निर्माते अदुर्थी सुब्बा राव यांच्यासोबत चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे १९५१ मध्ये त्यांनी तेलुगू चित्रपट 'पाठला भैरवी'साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं.

विश्वनाथ यांनी १९६५ च्या 'आत्मा गोवरम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं, ज्याला राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला. १९८० साली मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरलेल्या आणि गाजलेल्या तेलुगु चित्रपट 'शंकरभरनम'मुळे विश्वनाथ यांनी वेगळी ओळख मिळाली. चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला. शंकरभरम चित्रपटानं चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. नंतर त्याचा हिंदीत विश्वनाथ दिग्दर्शित 'सूर संगम' म्हणून रिमेक करण्यात आला होता. 

शंकरभरमच्या यशानंतर विश्वनाथ यांनी कला आणि संगीताची पार्श्वभूमी असणारे आणखी चित्रपट दिले. यात 'सागरा संगम', 'स्वाती किरणम', 'स्वर्ण कमलम', 'श्रुथिलायलू' आणि 'स्वराभिषेकम' या चित्रपटांचा समावेश आहे. १९८५ चा तेलगू चित्रपट 'स्वाती मुथ्यम' चित्रपट अकादमी पुरस्कारासाठी भारताकडून सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट या कॅटेगरीसाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेते कमल हासन एका ऑटिस्टिक पुरुषाच्या मध्यवर्ती भूमिकेत होते. जे एका तरुण विधवेच्या बचावासाठी पुढे येतात. 

विश्वनाथ यांनी १९७९ च्या 'सरगम' ​​चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, जो त्यांच्याच सिरी सिरी मुव्वा या चित्रपटाचा रिमेक होता. 'कामचोर', 'शुभ कामना', 'जग उठा इंसान', 'संजोग', 'ईश्‍वर' आणि 'धनवान' या त्यांच्या इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.
 

Web Title: Veteran Telugu filmmaker K Viswanath passes away at 92

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.