video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:14 PM2024-10-02T22:14:56+5:302024-10-02T22:16:38+5:30

Vettaiyan The Hunter Trailer: रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची जोडी 33 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे.

Vettaiyan The Hunter Trailer: Rajinikanth-Amitabh's Vettaiyaan trailer released | video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज

video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज

Vettaiyan The Hunter Trailer: सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित 'वेट्टैयान' चित्रपटाचा ट्रेलर आज(2 ऑक्टोबर 2024) अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अनेक दशकानंतर सुपरस्टार रजनीकांत आणि महानायक अमिताभ बच्चन यांची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट येत्या 10 ऑक्टोबर रोजी तामिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

33 वर्षांनंतर पडद्यावर एकत्र
टीगी ग्यानवेल दिग्दर्शित 'वेट्टैयान'मध्ये रजनीकांत यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, फहाद फसिल आणि राणा दग्गुबती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय मंजू वॉरियर, रितिका सिंग, दुशरा विजयन आणि अभिरामी हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट अमिताभ यांचा पहिला तमिळ चित्रपट आहे. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची जोडी 33 वर्षांनंतर पडद्यावर परतत आहे. दोघांनी 'हम' चित्रपटात काम केलो होते.

या 2 मिनिट 44 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये तुम्हाला ड्राम, ॲक्शन आणि इमोशनचा डोस पाहायला मिळेल. या चित्रपटाची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. हा चित्रपट रजनीकांत यांच्या आधीच्या चित्रपटाप्रमाने दमदार कामगिरी करेल, यात शंका नाही.

रजनीकांत रुग्णालयात दाखल 
रजनीकांत यांना 30 सप्टेंबर 2024 रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयाच्या मुख्य रक्तवाहिन्यांना सूज आल्याने त्यांना तातडीने दाखल करण्यात आले. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Web Title: Vettaiyan The Hunter Trailer: Rajinikanth-Amitabh's Vettaiyaan trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.