Vicky Kaushal, Katrina Kaif : फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:16 AM2022-08-30T11:16:17+5:302022-08-30T11:18:04+5:30

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे...

Vicky Kaushal And Katrina Kaif Shoot For Their First Advertisement Together | Vicky Kaushal, Katrina Kaif : फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स

Vicky Kaushal, Katrina Kaif : फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स

googlenewsNext

विकी कौशल (Vicky Kaushal ) व कतरिना कैफ (Katrina Kaif )हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना   पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चला तर, चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. होय, या कपलने आपल्या एका एकत्र प्रोजेक्टसाठीचं शूटींग पूर्ण केलं आहे. या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी व कॅटने आपल्या पहिल्या प्रोजेक्टचं शूटींग पूर्ण केलं आहे. अर्थात हा सिनेमा नसून एक जाहिरात आहे. मुंबईतील वांद्रे मेहबूब स्टुडिओमध्ये या जाहिरातीचं शूटींग पार पडलं. विकी व कॅट यांच्या लग्नानंतर दोघांना एकत्र घेऊन चित्रपट करण्याची अनेक मेकर्सची इच्छा होती. कपलला अशा अनेक ऑफर्स आल्या आहेत. मात्र अद्याप त्यांनी यापैकी एकाही प्रोजेक्टला होकार दिलेला नाही. 

विकी कौशल व कतरिनाची लव्हस्टोरी ‘कॉफी विद करण’मध्ये सुरू झाली होती. होय, 2018 साली विकी करणच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये आला होता. यावेळी तुझी आणि कतरिनाची जोडी सुंदर दिसेल, असं करण त्याला म्हणाला. हे ऐकून विकी हातभर उडाला होता. पुढे विकी कतरिनात असा काही गुंतला की सांगायलाच नको. आता दोघंही आपल्या संसारात आनंदी आहेत.

काही  दिवसांपूर्वीच विकी पुन्हा एकदा करणच्या ‘कॉफी विद करण 7’ या शोमध्ये आला. या शोमध्ये त्याने बायकोचं कौतुक केलं होतं. ‘कतरिना खूपच प्रेमळ आहे. ती नेहमी खरं बोलते, आपल्या भूमिकेवर ठाम असते. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं,’ असं काय काय विकी बोलला होता. अगदी तिच्यासारखी बायको मिळाली म्हणून मी स्वत:ला नशीबवान मानतो, असं काय काय तो म्हणाला होता.

Web Title: Vicky Kaushal And Katrina Kaif Shoot For Their First Advertisement Together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.