विकी कौशल व कतरिना कैफची लगीनघाई, दिग्दर्शक कबीर खानच्या घरी  झाला ‘रोका’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 10:20 AM2021-11-08T10:20:43+5:302021-11-08T10:21:37+5:30

Katrina Kaif Vicky Kaushal Roka : कॅट व विकी डिसेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी मात्र सुरू झाली आहे.

Vicky Kaushal And Katrina Kaif wedding Had Roka Ceremony On Diwali Day At Kabir Khan Home | विकी कौशल व कतरिना कैफची लगीनघाई, दिग्दर्शक कबीर खानच्या घरी  झाला ‘रोका’

विकी कौशल व कतरिना कैफची लगीनघाई, दिग्दर्शक कबीर खानच्या घरी  झाला ‘रोका’

googlenewsNext

गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आता एक ताजी खबर आहे. होय, दिवाळीच्या दिवशी कतरिना व विकीचा रोका झाल्याचे कळतेय. कॅट व विकी डिसेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी मात्र सुरू झाली आहे. अगदी प्री-वेडिंग फंक्शनही सुरू झाले आहे.

कतरिनाच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅट व विकीचा रोका नुकताच पार पडला. दिग्दर्शक कबीर खान याच्या घरी दिवाळीच्या मुहूर्तावर ही रोका सेरेमनी झाली. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटात कतरिनाने काम केले होते. कतरिना कबीरला आपला भाऊ मानते. कबीर व त्याची पत्नी मिनी माथूर कतरिनाच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यांनी रोका सेरेमनीची सगळी तयारी केली. यावेळी कतरिनाची आई सुजैन, बहीण इसाबेल शिवाय विकी कौशलचे वडिल श्याम कौशल, आई वीणा कौशल व भाऊ सनी कौशल असे अगदी जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. रोका सेरेमनीवेळी सुंदर सजावट करण्यात आली होती.

हनीमून तूर्तास नाहीच...
विकी कौशल व कतरिना डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. पण प्राप्त माहितीनुसार, यानंतर दोघांचा हनीमून प्लान नाही. कारण दोघेही आपआपल्या कामात अतिशय बिझी आहेत. केवळ बिझी शेड्यूलमुळे कॅट व विकी यांनी राजस्थानात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोघांचा विदेशात डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान होता.

Web Title: Vicky Kaushal And Katrina Kaif wedding Had Roka Ceremony On Diwali Day At Kabir Khan Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.