कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, "खरंच गुडन्यूज..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 09:01 AM2024-06-29T09:01:15+5:302024-06-29T09:01:46+5:30
विकी आणि कतरिना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, यावर कतरिना किंवा विकीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता अखेर विकी कौशलने अभिनेत्रीच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून चाहत्यांना कतरिना-विकीच्या पर्सनल लाइफबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कतरिनाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एअरपोर्टवरील तिच्या फोटोंमध्ये अभिनेत्री बेबी बंप लपवत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे कतरिना गरोदर असून विकी आणि ती लवकरच आईबाबा होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.
विकी आणि कतरिना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, यावर कतरिना किंवा विकीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता अखेर विकी कौशलने अभिनेत्रीच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. सध्या विकी त्याचा आगामी चित्रपट 'बॅड न्यूज'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या इव्हेंटमध्ये विकीला कतरिनाच्या गुड न्यूजबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर विकीने उत्तर दिलं.
विकी म्हणाला, "जेव्हा गुडन्यूज असेल तेव्हा सगळ्यात आधी मी मीडियाला सांगेन. पण, सध्या तरी तुम्ही 'बॅड न्यूज' एन्जॉय करा. पण, जेव्हा खरंच गुडन्यूज असेल. तेव्हा आम्ही नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू". विकीच्या या वक्तव्यानंतर मात्र आता कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना ब्रेक लागला आहे. याआधी कतरिनाच्या टीमकडूनही या चर्चांचं खंडन केलं गेलं होतं.
दरम्यान, कतरिना आणि विकी कौशलने २०२१मध्ये लग्न केलं होतं. राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या विकी त्याच्या 'बॅड न्यूज' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. या सिनेमात तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा १९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.