विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:29 PM2022-12-28T17:29:31+5:302022-12-28T17:30:08+5:30

Vicky Kaushal-Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.

Vicky Kaushal-Katrina Kaif celebrate New Year at this place, photos revealed | विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर

विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर

googlenewsNext

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) प्रत्येक सण किंवा इतर कोणताही प्रसंग एकत्र साजरे करतात आणि दोघेही अनेकदा सुट्टीत एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसतात. सध्या हे कपल नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजस्थानला पोहोचले आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवसात विकी आणि कतरिना जोधपूरजवळ जवाई लेपर्ड सेंच्युरीमध्ये आहेत. 'मेरा नाम गोविंदा' अभिनेत्याने त्याच्या सुट्टीसोबत बिबट्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

मंगळवारी विक्की कौशलने बिबट्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय जो त्याने क्लिक केला होता. या फोटोसोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये 'स्पॉटेड' असे लिहिले आहे.

बुधवारी सकाळी, विकीने सफारीतून सूर्योदयाचा आनंद लुटल्याची एक झलक शेअर केली. फोटोत विकी एका मोकळ्या वाहनात उभा असलेला दिसतो. या फोटोंसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, २०२३ मध्ये उदयास येत आहे.

विकी आणि कतरिना सोमवारी दुपारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. नंतर, जोडप्याला जयपूर विमानतळावरून बाहेर पडताना क्लिक करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिनाने जोधपूरजवळ जवाई लेपर्ड सेंच्युरीमध्ये जाण्यासाठी रोड ट्रिप केली. हे जोडपे त्यांच्या नवीन वर्षाच्या दिवसापर्यंत येथेच राहण्याची शक्यता आहे. विकी आणि कतरिनाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानमधील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्न केले होते.

Web Title: Vicky Kaushal-Katrina Kaif celebrate New Year at this place, photos revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.