पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:06 PM2022-12-30T17:06:32+5:302022-12-30T17:07:31+5:30

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये जेव्हा सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार येतात तेव्हा एक वेगळीच धमाल असते.

vicky-kaushal-revealed-that-he-reduces-weight-by-eating-junk-food-need-to-go-to-gym-togain-weight | पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात

पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये जेव्हा सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार येतात तेव्हा एक वेगळीच धमाल असते. बिग बी सुद्धा या कलाकारांसोबत मस्ती करताना दिसतात. तर नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) हे सहभागी झाले. यावेळी त्यांच्यात मजेशीर गप्पा झाल्या. केबीसीच्या मेकर्सने पोस्ट केलेला या एपिसोड मधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

केबीसी शोमध्ये विकी कौशल सांगतो, 'सर मला एक सुंदर त्रास आहे. माझं वजनच वाढत नाही. मी पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करु शकतो.' हे ऐकून अमिताभ बच्चन यांना धक्काच बसतो. ते विचारतात मग वजन वाढवण्यासाठी काय करावं लागतं. तर विकी म्हणतो, 'खूप बोरिंग खाणं खाऊन माझं वजन वाढतं.लोकं वजन कमी करायला जिममध्ये जातात पण मला वजन वाढवण्यासाठी जिम मध्ये जावं लागतं. पंजाबी साठी तर ही फारच छान समस्या आहे.' विकी चा त्रास ऐकून सर्वच खळखळून हसतात. 

विकी आणि किआराचा नुकताच गोविंदा नाम मेरा हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघांनी केबीसीच्या मंचावर हजेरी लावली आणि चांगलीच धमाल केली.

Web Title: vicky-kaushal-revealed-that-he-reduces-weight-by-eating-junk-food-need-to-go-to-gym-togain-weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.