विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या रोमँटिक केमिस्ट्रीवर चाहते फिदा, नेटकरी म्हणाले, 'कतरिनाचा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:17 AM2024-07-08T09:17:58+5:302024-07-08T09:22:48+5:30

सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज होत आहे. गाण्याच्या पहिल्या लूकमध्ये तृप्ती आणि विकी बोल्ड पोज देताना दिसत आहेत.

Vicky Kaushal Tripti Dimri song Jaanam poster release from upcoming movie bad news | विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या रोमँटिक केमिस्ट्रीवर चाहते फिदा, नेटकरी म्हणाले, 'कतरिनाचा...'

विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या रोमँटिक केमिस्ट्रीवर चाहते फिदा, नेटकरी म्हणाले, 'कतरिनाचा...'

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांचा 'बॅड न्यूज' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोमँटिक कॉमेडी असणाऱ्या या सिनेमातीलविकी कौशलतं "तौबा तौबा' हे गाणं खूपच गाजतंय. सिनेमा पंजाबी अभिनेता एमी विर्क सुद्धा आहे. सिनेमाची कथा तर खूपच कॉमेडी असून विकी आणि तृप्तीचा रोमान्सही यामध्ये पाहायला मिळतोय. सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज होत आहे. गाण्याच्या पहिल्या लूकमध्ये तृप्ती आणि विकी बोल्ड पोज देताना दिसत आहेत.

'तौबा तौबा' गाण्यानंतर आता विकी कौशलचा बोल्ड अँड सेक्सी अवतार पाहायला मिळणार आहे. तृप्ती डिमरीसोबत त्याने अक्षरश: आग लावली आहे. कालच दोघांनी सिनेमातील 'जानम' या आणखी एका गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केला. यामध्ये तृप्ती ब्लू बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तर विकीचा शर्टलेस अवतार आहे. उद्या 9 जुलै रोजी गाणं चाहत्यांच्या भेटीला येईल. फर्स्ट लूकच इतका रोमँटिक आहे तर आता गाणं काय असेल याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

गाण्याचं हे पोस्टर पाहून कमेंट्समध्ये चाहत्यांनी विकी कौशलची चेष्टा केली आहे. 'कतरिनाचा धाक नाही का?','मी तर सहन नसतं केलं कतरिना','भाई, पत्नी मारत नाही का?' अशा मजेशीर कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.

'बॅड न्यूज' हा धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तृप्ती डिमरी यामध्ये प्रेग्नंट होते मात्र होणाऱ्या बाळाचे दोन बाप असतात असं डीएनए टेस्टमध्ये समोर येतं. ट्रेलरमध्येच दमदार कॉमेडी आहे त्यामुळे सिनेमाही मजेशीर असणार आहे. ट्रेलरमधून सर्वांनाच विकी कौशलचा अंदाज भलताच आवडलाय. 

Web Title: Vicky Kaushal Tripti Dimri song Jaanam poster release from upcoming movie bad news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.